जन्नत झुबेर ‘नो किसिंग पॉलिसी’वर का आहे ठाम? वडिलांची ‘ती’ अट, अभिनेत्री सोडलं मौन
Jannat Zubair : सोशल मीडिया स्टार जन्नत झुबेर हिने ‘नो किसिंग पॉलिसी’वर सोडलं मौन, अभिनेत्री पडद्यावर का देत नाही किसिंग सीन, वडिलांची 'ती' अट... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जन्नत झुबेर हिची चर्चा...

झगमगत्या विश्वात आता फक्त सिनेमांमध्येच नाहीतर, मालिकांमध्ये देखील इंटिमेट सीन कथेची गरज असल्यामुळे अभिनेता – अभिनेत्रींना करावे लागतात. पण काही सेलिब्रिटी सीन करण्यास नकार देतात आणि ‘नो किसिंग सीन’वर ठाम राहातात. अभिनेत्री जन्नत झुबेर हिने देखील किसिंग सीनसाठी नकार दिला आहे. एका मुलाखतीत अभिनेत्री ‘नो किसिंग सीन’वर मोठं वक्तव्य केलं आहे. जन्नत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
जन्नत सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्रीने ‘फुलवा’ मालिकेतून बालकलाकार म्हणून काम केलं. त्यानंतर अभिनेत्रीने ‘तू आशिकी’ मालिकेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.. मालिकेत अभिनेत्री को-स्टारसोबत इंटिमेट सीन द्यायचे होते.. पण अभिनेत्रीने किसिंग सीनसाठी नकार दिला…
View this post on Instagram
एक मुलाखतीत अभिनेत्री तिच्या ‘नो किसिंग पॉलिसी’बद्दल सांगितलं आहे. ‘वडिलांनी मला मालिकेत किसिंग सीन करु नकोस म्हणून सांगितलं होतं. तेव्हा मी फक्त 17 वर्षांची होती. माला माझ्या चौकटीतून बाहेर यायचं नव्हत. माझ्यासाठी ती गोष्ट प्रचंड कठीण आहे. जेव्हा मी सर्वांसमोर ‘नो किसिंग पॉलिसी’बद्दल जाहीर केलं. तेव्हा सर्वांनी माझ्या निर्णयाचं स्वागत केलं…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘नो किसिंग पॉलिसी’बद्दल घोषणा केल्यानंतर कोणी माझा विरोध केला नाही किंवा कोणती कमेंट केली नाही.. माझ्या वडिलांनी घेतलेल्या निर्णयाची मला खंत वाटत नाही..’, जन्नत कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
View this post on Instagram
जन्नत झुबेर सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावरील तिच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
