AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोहाने वडिलांच्या कबरीवर ठेवलेली ‘ती’ गोष्ट पाहून भडकले नेटकरी; म्हणाले ‘इस्लाममध्ये हे सहन नाही..’

अभिनेत्री सोहा अली खानने वडिलांच्या जन्मदिनानिमित्त सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले. मात्र याच फोटोंवरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात येतंय. इस्लाम धर्मात हे सर्व करण्याची परवानगी नाही, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

सोहाने वडिलांच्या कबरीवर ठेवलेली 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी; म्हणाले 'इस्लाममध्ये हे सहन नाही..'
सोहा अली खान, कुणाल खेमू आणि इनायाImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 06, 2025 | 9:26 AM
Share

अभिनेता सैफ अली खान आणि सोहा अली खान यांचे वडील मन्सूर अली खान यांचा रविवारी 84 वा जन्मदिन होता. यानिमित्त सोहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले. पती कुणाल खेमू आणि मुलगी इनायासोबत सोहा तिच्या वडिलांच्या कबरीवर गेली. तिथे त्यांनी मेणबत्ती, केक आणि पत्र ठेवलं. सोहाने वडिलांप्रती असलेल्या प्रेमापोटी हे सर्व केलं असलं तरी काही नेटकऱ्यांना तिची ही कृती अजिबात आवडली नाही. हे सर्व इस्लामच्या नियमांच्या विरोधात असल्याची टीका काहींनी केली. सोहाने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये चिमुकली इनायासुद्धा आजोबांच्या कबरीवर केकचा तुकडा ठेवताना आणि मेणबत्ती विझवताना दिसतेय. सोहाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

‘जेव्हा तुम्हाला तुमच्या धर्माबद्दल शून्य ज्ञान असतं.. तुम्ही फतेहा वाचलं पाहिजे आणि हे सर्व करू नका. इस्लाममध्ये या सर्व गोष्टींना परवानगी नाही’, असं एकाने लिहिलंय. तर ‘हे काय आहे? त्यापेक्षा त्यांच्यासाठी कुराण वाच, दुआ झिक्र कर’, असा सल्ला दुसऱ्याने दिला आहे. ‘प्रिया सोहा मॅडम, आपण कबरीचे फोटो नाही काढले पाहिजे. त्याचप्रमाणे कबरीवर केक किंवा इतर खाद्यपदार्थ ठेवू नयेत. त्यांना फक्त आपल्या दुआची गरज असते’, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर काहींनी सोहाची बाजू घेत नेटकऱ्यांना ट्रोल न करण्याचा सल्ला दिला आहे. ‘आपण जेव्हा खुश असतो, तेव्हा देवसुद्धा खुश असतो. त्यामुळे ज्यांना जसं करायचं आहे, तसं करू द्या’, असं काहींनी म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Soha (@sakpataudi)

मन्सूर अली खान हे पतौडी म्हणूनही ओळखले जातात. भारतीय क्रिकेट विश्वात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा जन्म 5 जानेवारी 1941 रोजी झाला. त्यांनी 1960 ते 1970 पर्यंतत भारतीय क्रिकेट संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. ते त्यांच्या शांत स्वभावासाठीही ओळखले जायचे. 1968 मध्ये त्यांनी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी लग्न केलं. धर्माची सीमा ओलांडून लग्न करणं त्याकाळी सहज सोपं नव्हतं. शर्मिला टागोर यांना एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न करण्यासाठी बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला होता.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.