करोडपती, तरीही ही अभिनेत्री महागड्या ट्रिटमेंट नाही तर, 20 ते 30 रुपयांच्या पावडरने चेहऱ्यावर ग्लो आणते; अभिनेत्रीचे घरगुती ब्युटी सिक्रेट
करोडपती असूनही ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी कोणत्याही महागड्या ट्रिटमेंट्स न वापरता ती नैसर्गिक उपायांना महत्त्व देते. फक्त 20 ते 30 रुपयांना मिळणाऱ्या एका पावडरचा घरगुती फेस पॅकने चेहऱ्यावर लावते. तसेच या अभिनेत्रीने तिचा हा DIY चा व्हिडीओ देखील तिच्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच स्वत:ची काळजी घेणेही गरजेचे आहे. विशेषत: अभिनेत्रींना आपल्या त्वचेपासून ते डाएटपर्यंत सगळी काळजी घ्यावी लागते. त्यासाठी अभिनेत्री महागड्या ट्रिटमेंट, महागडे प्रोडक्ट वापरतात. काहीजणींनी तर सौंदर्यात भर घालण्यासाठी सर्जरी देखील केल्या आहेत. पण अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या सौंदर्याला उजाळा देण्यासाठी घरगुती उपायांनाही तेवढंच महत्त्व देतात. अनेक अभिनेत्रींनी त्यांचे हे DIY हॅक्स त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे जीची करोडोंची संपत्ती आहे. मात्र तरीही ती कायम नैसर्गिक पर्याय निवडताना दिसली आहे.
महागड्या ब्रँड नाही तर घरगुती उपचारांनी सौंदर्य वाढवते
स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या एका साध्या पावडरणे स्वत:चं सौंदर्य वाढवण्याचा ती प्रयत्न करत असते. ही अभिनेत्री म्हणजे सोहा अली खान. . सोहा जितकी प्रतिभावान आहे तितकीच ती साधी आणि सुंदर आहे. सोहा पतौडी कुटुंबातून येते. शिवाय तिची करोडोंची संपत्ती आहे. मात्र तरीही ती तिच्या सौंदर्यासाठी कोणत्याही महागड्या ट्रिटमेंट न करता त्याचं श्रेय कोणत्याही महागड्या ब्रँडेड उत्पादनांना न देता स्वयंपाकघरात ठेवलेल्या घरगुती उपचारांना देते. सोहाने हे सिद्ध केले की खरे सौंदर्य महागड्या मेकअपने नाही तर नैसर्गिकपद्धतीने देखील घेता येते. तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एक फेस पॅक लावताना दिसत आहे. तेही अगदी 20 ते 30 रुपयांना मिळणाऱ्या एका पावडरणे.
अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याचे रहस्य उलगडलं आहे
सोहाने म्हटलं आहे की, ती तिच्या त्वचेवर कोणतेही रासायनिक पदार्थ वापरत नाही. तिच्या त्वचेवर स्वयंपाकघरात असणारे बेसन, हळद आणि दही लावते. ती म्हणते की नैसर्गिक घटक त्वचेवर लावल्याने त्वचा केवळ निरोगी दिसत नाही तर ती अधिक काळ तरुण आणि चमकदार राहते.
फेस पॅकसाठी लागणारे साहित्य
बेसन हळद चंदन पावडर दही गुलाब पाणी मध (जर तुमच्या त्वचेवर मुरुम असतील तर मध घालू नका)
हा फेसपॅक कसा बनवायचा
एका भांड्यात बेसन ठेवा, त्यात हळद, चंदन पावडर, दही, गुलाबजल आणि थोडे मध घाला. चांगले मिसळा आणि चेहऱ्याला 10 ते 15 मिनिटे लावा. कोरडे झाल्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि थंड पाण्याने धुवा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर प्रथम पॅच टेस्ट करा.
View this post on Instagram
बेसनाचे फायदे
बेसन त्वचेसाठी नैसर्गिक क्लींजर म्हणून काम करते. ते घाण, तेल आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार राहते. नियमित वापरामुळे टॅनिंग कमी होते आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळते.
हळद
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे मुरुमे आणि त्वचेचे संक्रमण कमी करण्यास मदत करतात. ते त्वचा आतून स्वच्छ करते आणि चेहऱ्याची चमक सुधारते.
चंदन पावडरचे फायदे
चंदन त्वचेला आराम देते आणि लालसरपणा आणि जळजळ कमी करते. ते त्वचा मऊ करते आणि मुरुमांमुळे होणारी चेहऱ्याची जळजळही कमी करते. त्याचा सुगंध मनालाही आराम देतो.
दही
दह्यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट आणि मऊ करते. ते त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि कोरडेपणा कमी करते. यामुळे तिची नैसर्गिक चमक वाढते आणि त्वचेचा रंग सुधारतो. जर तुम्हाला सोहा अली खानसारखी स्वच्छ, चमकदार त्वचा हवी असेल, तर हा सोपा घरगुती पॅक वापरून पाहू शकता. कोणत्याही खर्चाशिवाय किंवा रसायनांशिवाय, तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि निरोगी होऊ शकते.
