Sonakshi Sinha Pregnant: सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? पती झहीर इक्बालमुळे सत्य आले समोर
सोनाक्षी सिन्हाला गरोदर असल्याच्या अफवा गेल्या काही काळापासून पसरत होत्या. मात्र, आता अभिनेत्रीने स्वतः या रहस्यावरून पडदा हटवला आहे आणि लोक अशा गोष्टी का बोलत आहेत, यात किती सत्य आहे, हे स्पष्ट केलं आहे.

2024 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने लग्न केलं आणि ती तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत राहिली. तिने अभिनेता झहीर इक्बालसोबत अंतरजातीय लग्न केले. लग्नानंतर दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत आणि अनेक ठिकाणी ते एकत्रही दिसले होते. अलीकडेच सोनाक्षी सिन्हा पुन्हा चर्चेत आली ती गरोदर असल्याच्या अफवांमुळे. आता सोनाक्षीने तिचा पती झहीर इक्बालसोबत एक पोस्ट शेअर करत यामागील कारण स्पष्ट केलं आहे.
सोनाक्षीने इंस्टाग्रामवर झहीरसोबतच्या संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात झहीर तिला विचारतो, “तुला भूक लागली आहे का?” त्याला उत्तर देताना सोनाक्षी म्हणते, “अजिबात नाही. तू मला खायला देणं बंद कर.” यावर झहीर म्हणतो, “मला वाटलं ही सुट्टी सुरु झाली आहे.” सोनाक्षीने लगेच उत्तर देते, “मी आत्ताच तुझ्यासमोर जेवले आहे. आता तू थांब” असे म्हटले. यानंतर झहीर म्हणतो, “आय लव्ह यू.” याला सोनाक्षी उत्तर देते, “मी तुझ्यावर खूप प्रेम करते.”
वाचा: मयूरी देशमुखने रोमँटिक सीन शूट करताना अभिनेत्याच्या लगावली कानशिलात, नेमकं काय झालं?
झहीर ज्या पद्धतीने सोनाक्षीची काळजी घेत आहे, त्यामुळे लोकांना वाटत आहे की कदाचित सोनाक्षी गरोदर आहे. मात्र, सोनाक्षीने यावर स्पष्टीकरण देत सांगितलं की, सध्या तरी अशी कोणतीही गोष्ट नाही. सोनाक्षी आणि झहीर यांनी 2024 मध्ये लग्न केलं होतं. या लग्नात खास पाहुणे उपस्थित होते आणि यावेळच्या फोटोंनी सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घातला. मात्र, कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं.
वर्क फ्रंटवर काय करत आहे सोनाक्षी सिन्हा?
सोनाक्षी सिन्हा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात उत्तम समतोल राखत आहे. ओटीटीवरील ‘धाकड’ सारख्या दमदार सीरिज आणि ‘हीरामंडी’मध्ये दुहेरी भूमिका साकारल्यानंतर सोनाक्षीचा आत्मविश्वास वाढला आहे. 2024 मध्ये ती ‘काकुडा’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटांचा भाग होती. 2025 मध्ये तिचा ‘निकिता रॉय’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
