AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डायरेक्टरसोबत प्रेमसंबंध म्हणूनच सुपरहिट… प्रसिद्ध अभिनेत्री 40 वर्षांनंतर म्हणाली, ‘माझ्याकडे दुसरा पर्यायच…’

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण... डायरेक्टरसोबत प्रेमसंबंध म्हणूनच... प्रसिद्ध अभिनेत्रीने अखेर चर्चांवर लावला पूर्णविराम... अभिनेत्री म्हणाली, 'माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता... '

डायरेक्टरसोबत प्रेमसंबंध म्हणूनच सुपरहिट... प्रसिद्ध अभिनेत्री 40 वर्षांनंतर म्हणाली, 'माझ्याकडे दुसरा पर्यायच...'
Sonam Khan
| Updated on: Jun 22, 2026 | 9:56 AM
Share

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी दिग्दर्शकासोबत लग्न केलं. आता देखील अशाच एका अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, जिने दिग्दर्शकासोबतच लग्न केलं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सोनम खान आहे… सोनम हिने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं. पण ‘ओये ओये’ गाण्यामुळे तिची लोकप्रियता गगनाला भिडली. गेल्या 40 वर्षांपासून हे गाणं चर्चेत आहे.. कारण ‘त्रिदेव’ सिनेमात सोनम हिची एन्ट्री झाली कारण, दिग्दर्शकासोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर ‘त्रिदेव’ सिनेमाचे दिग्दर्शक राजीव राय यांच्यासोबत अभिनेत्री लग्न देखील केलं. अखेर 40 वर्षांनंतर इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्री मोठा खुलासा केला आहे…

सोनम खान हिने इन्स्टाग्रामवर ‘त्रिदेव’ सिनेमातील ‘ओये ओये’ हे लोकप्रिय गाणं असलेला एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘सत्य तर हे आहे की, ‘त्रिदेव’ सिनेमाच्या दिग्दर्शकासोबत माझं अफेअर नव्हतं… तर पुढे वाचा… ‘त्रिदेव’च्या शुटिंगचा पहिला दिवस होता… पहिलं गाणं… पहिली अफवा… लोकांचा असा समज होता की, ‘त्रिदेव’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान आमच्यामध्ये रोमान्स सुरु होता आणि याच कारणामुळे मला दुसऱ्या अभिनेत्रींच्या तुलनेत अधिक स्क्रिन टाईम मिळाला आणि एक सुपरहिट गाणं देखील… जो देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात धुमाकूळ घालत होता… पण सत्य काही वेगळंच होतं…’

View this post on Instagram

A post shared by Sonam Khan (@sonamkhan_72)

सोनम पुढे म्हणाली, ‘राजीव सेटवर कायम त्याच्या गर्लफ्रेंडसोबत असायचा आणि माझा बॉयब्रेंड देखील सेटपासून थोड्य अंतरावर होता.. आम्ही दोघे पहिल्यापासून दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होतो… एक गंमत सांगते, राजीवला तर मला ‘त्रिदेव’मध्ये घ्यायची अजिबात इच्छा नव्हती. त्याने आधीच दुसऱ्या एका अभिनेत्रीशी डिला केलेली, कारण ‘विजय’ सिनेमातील माझं काम त्याला फारसं आवडलं नव्हतं. थोडक्यात सांगायचं तर, मी त्यांची ‘शेवटची पसंती’ होते, जेव्हा त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नाही, तेव्हाच मला त्या भूमिकेसाठी घेतलं . त्यामुळे, तिथे कोणतीच लव्हस्टोरी नव्हती, कसलेही गुपचूप फोन कॉल्स नव्हते किंवा दिग्दर्शकाचा गैरफायदा घेण्याचा प्रकारही नव्हत किंवा कदाचित तसं काही घडलं असेल, तर मला त्याची कल्पना नाही. मी जर खूपच भोळी किंवा स्वप्नांच्या जगात वावरणारी वाटत असेन, तर कृपया मला माफ करा. हे गाणे खूपच छान आहे.’

राजीव राय आणि सोनम खान यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘त्रिदेव’ सिनेमानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. 1991 मध्ये दोघांनी लग्न केलं… लग्नानंतर सोनम हिने अभिनयाला रामराम ठोकला… त्यानंतर राजीव आणि सोनम यांनी दोन मुलांचं जगात स्वागत केलं. युरोपमध्ये स्थायिक होण्यापूर्वी अभिनेत्री लॉस एंजेलिस आणि लंडनमध्ये राहत होती.

पण राजीव आणि सोनम यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर 2001 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सोनम 1992 साली प्रदर्शित झालेल्या ‘विश्वात्मा’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आल्यानंतर गायब झाली… आता 30 वर्षांनंतर अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.

Follow Us
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल