सोनू सूदने सांगितला कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्याचा फंडा, चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला!

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) घरीच विलागीकारणात आहे. या कठीण काळात सोनू स्वत:ला कसा प्रोत्साहित करत आहे आणि कोव्हिडविरूद्धची लढाई जिंकण्यासाठी काय करत आहे, याबद्दल अभिनेत्याने सांगितले आहे.

सोनू सूदने सांगितला कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्याचा फंडा, चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला!
सोनू सूद

मुंबई : कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) घरीच विलागीकारणात आहे. या कठीण काळात सोनू स्वत:ला कसा प्रोत्साहित करत आहे आणि कोव्हिडविरूद्धची लढाई जिंकण्यासाठी काय करत आहे, याबद्दल अभिनेत्याने सांगितले आहे. सोनूने चाहत्यांना देखील हा सल्ला दिला आहे. सोनू म्हणतो की, आपण कोरोना पॉझिटिव्ह असाल, तर औषधांसह आपल्याला स्वतःला सकारात्मक ठेवावे लागेल आणि अशा प्रकारे आपण लवकरच बरे होऊ शकता (Sonu Sood share important message with fans regarding corona battle).

सोनू सूद स्पॉटबॉयशी बोलताना म्हणाला की, ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की, जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असाल तर स्वतःची काळजी घ्या. कारण कोणीही दुसरे तुमची काळजी घेणार नाही आणि ही कोरोनाची ही सर्वात भयानक गोष्ट आहे. यामुळे तुम्हाला पूर्णपणे विलगीकरणात राहावे लागते.’

कशी कराल कोरोनावर मात?

तर मग आपण या कठीण काळात यावर कसे मात करू शकतो यावर सोनू म्हणाला की, ‘कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रोत्साहित करता आले पाहिजे. आपल्‍याला नेहमीच सुपर चार्ज राहवे लागेल, कोणत्याही वेळी लो फील होऊ नये. फक्त यावर लक्ष केंद्रित करा की, आपल्याला कोरोनामधून पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात परतायचे आहे.’

तो म्हणाला की, ‘आता मी अलगीकरणात असलो तरी, पूर्वीपेक्षा जास्त काम करत आहे. माझ्या लस मोहिमेचा वेग कमी होऊ नये म्हणून, मी फोनद्वारे माझ्या प्रकल्पांची सतत काळजी घेत आहे.’

सोनूने असेही सांगितले की, जरी तो कोरोना पॉझिटिव्ह झाला असला तरीही तो गरजू लोकांना मदत करत आहेत. तो म्हणाला, ‘ते ऑक्सिजन असो किंवा हॉस्पिटलचे बेड, मी लोकांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पाठवत आहे. आपण घरी असल्यास, कृपया आनंदी रहा आणि आपल्याला जे चांगले वाटेल ते करा. मदतीसाठी मला कधीही कॉल करा.’(Sonu Sood share important message with fans regarding corona battle)

लसीकरण मोहिमेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर सोनू सूद

काही दिवसांपूर्वी पंजाब सरकारने सोनू सूद याला लसीकरण मोहिमेचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नेमले आहे, जेणेकरुन अधिकाधिक लोकांना लसीकरणाबद्दल जागरूक केले जाईल. सरकारच्या या निर्णयाने सोनूचे चाहते खूप खुश झाले आहेत.

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्यानंतर सोनू म्हणाला, मी खूप भाग्यवान आहे की, मी पंजाब सरकारच्या या मोहिमेचा एक भाग आहे. मला माहित आहे की मी संरक्षक नाही. मी फक्त एक माणूस आहे आणि देवाच्या मोठ्या योजनांचा एक छोटासा भाग आहे. जर एखाद्याच्या आयुष्यात मी काहीतरी चांगले करू शकत असेल, तर ते माझे सौभाग्य आहे. मी म्हणेन की देवाने मला आशीर्वादित केले आहे, तो मला मार्ग दाखवतो आणि त्याच्या मदतीने मी हे कार्य करण्यास सक्षम आहे.

(Sonu Sood share important message with fans regarding corona battle)

हेही वाचा :

‘मेल व्हर्जन ऑफ कंगना’ म्हणत रणवीर शौरीला केले ट्रोल, अभिनेत्याने दिले चोख प्रत्युत्तर!

PHOTO | शाहरुखच्या लेकीने शेअर केला ‘बेडरूम मिरर सेल्फी’, सुहानाच्या फिटनेसचं चाहत्यांकडून कौतुक!

Published On - 1:05 pm, Wed, 21 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI