AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्वतः कमवा आणि घर चालवा’; सोनू सूद गरीब मजुरांना ई-रिक्शा भेट देणार

लॉकडाऊन काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सतत कोरोनाने प्रभावित झालेल्या लोकांना मदत करत होता. लॉकडाऊन दरम्यान त्याने अनेकांना जेवण, पैसे दिले. हजारो मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवलं होतं.

'स्वतः कमवा आणि घर चालवा'; सोनू सूद गरीब मजुरांना ई-रिक्शा भेट देणार
| Updated on: Dec 13, 2020 | 5:28 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर चार ते सहा महिने देशभरात लॉकडाऊन होता. या लॉकडाऊन काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सतत कोरोनाने प्रभावित झालेल्या लोकांना मदत करत होता. लॉकडाऊन दरम्यान त्याने अनेकांना जेवण, पैसे दिले. हजारो मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवलं तर अनेकांना वैद्यकीय मदतही केली. सोनू सूद कोरोना काळात प्रवासी मजुरांसाठी देवदूत ठरला होता. दरम्यान, सोनू सूदने लोकांसाठी काम करणं अजूनही सुरुच ठेवलं आहे. लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गमावलेले, मजूर तसेच गरजवंतांच्या मदीसाठी सोनू पुढे आला आहे. (Sonu Sood To Gift E-Rickshaws To Those Who Lost Jobs During Pandemic and Needy peoples)

गरजूंसाठी सोनू सूदने ‘ खुद कमाओ घर चलाओ’ (‘स्वतः कमवा आणि घर चालवा’) ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सोनू सूद गरिबांना, रोजगार गमावलेल्या गरजवंतांना ई-रिक्षा भेट देणार आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या बरी नाही. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांनी रोजगार गमावले आहेत. सध्या देशात नवे रोजगार नाहीत, अशा परिस्थिती सोनू सूदने रोजगार निर्माण करणारी ही योजना आणून मोठं पाऊल उचललं आहे. यामुळे सोनू सूदचे कौतुक केले जात आहे.

या योजनेबद्दल बोलताना सोनू सूद म्हणाला की, “गेल्या काही काळापासून मला लोकांकडून खूप प्रेम मिळतंय. हे प्रेम मला त्यांच्यासाठी अजून काहीतरी करण्यासाठी प्रेरणा देत होतं. त्यामुळेच मी ही ‘स्वतः कमवा आणि घर चालवा योजना सुरु केली आहे’. मला असं वाटतं की, लोकांना पैशांची मदत करण्यापेक्षा त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करु देणं उत्तम पर्याय आहे”.

सोनू म्हणाला की, “लोकांना काही पैशांची मदत केली तर ते पैसे काहीच दिवस पुरतील, परंतु त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या तर त्यातून त्यांना कायमस्वरुपी आर्थिक लाभ होईल. हा उपक्रम त्यांना स्वावलंबी होण्यास आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करेल, असा मला विश्वास वाटतो”.

मदतकार्य अद्यापही सुरूच

सोनूकडून लोकांसाठी मदतकार्य अजूनही सुरुच आहे. लॉकडाऊन काळात लोकांच्या मदतीसाठी त्याने हेल्पलाईन सुरु केली होती. ती हेल्पलाईन अजूनही सुरु आहे. याआधी त्याने पंजाबच्या पॅरामेडिकल स्टाफला 1 हजार 500 पीपीई किट आणि पोलिसांना 25 हजार फेस शील्ड्स दिले होते. लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. दरम्यान, नुकतीच त्याने वेगवेगळ्या सिनेमांच्या शूटींगलाही सुरूवात केली आहे.

सोनू सूदचा संयुक्त राष्ट्रसंघाकडून सन्मान

कोरोना महामारीच्या काळात अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) स्थलांतरित मजुरांसह तळागाळातील लोकांची मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. सोनू सूदच्या या कार्याची दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आहे. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या (UNDP) विशेष ह्युमनटेरियन पुरस्काराने (Award) सोनू सूदला सन्मानित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

दोन दुकाने, सहा फ्लॅट गहाण ठेवून गरिबांना मदत; गरजवंतांच्या मदतीसाठी सोनू सूदने घेतलं 10 कोटींचं कर्ज

बैलांच्या जागेवर मुलींना जुंपून शेत नांगरलं, सोनू सूदकडून शेतकऱ्याला घरपोच ट्रॅक्टर

‘सामना’नाट्यानंतर सोनू सूद ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची भेट

Sonu Sood | पंजाबचा ‘स्टेट आयकॉन’, अभिनेता सोनू सूदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

(Sonu Sood To Gift E-Rickshaws To Those Who Lost Jobs During Pandemic and Needy peoples)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.