AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दिवसासाठी 5 लाख रुपये, कोण आहे राम चरणचा हा विदेशी बॉडीगार्ड? सलमान खानच्या शेराला देतो टक्कर

राम चरणचा विदेशी बॉडीगार्ड कोण? जो 30 सेकंदांमध्ये मारतो 15 किक्स. एका दिवसासाठी घेतो 3 ते 5 लाख रुपये मानधन. सलमान खानच्या बॉडीगार्डला टाकले मागे.

एका दिवसासाठी 5 लाख रुपये, कोण आहे राम चरणचा हा विदेशी बॉडीगार्ड? सलमान खानच्या शेराला देतो टक्कर
| Updated on: May 29, 2026 | 5:19 PM
Share

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण हा नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि मोठ्या बजेटच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी तो कोणत्याही सिनेमामुळे नाही तर आपल्या पर्सनल बॉडीगार्डमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. राम चरणसोबत कायम सावलीसारखा दिसणारा हा व्यक्ती नेमका कोण आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

अलीकडे सोशल मीडियावर राम चरणचे काही फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या व्हिडीओंमध्ये त्याच्यासोबत एक उंच, ताकदवान आणि विदेशी व्यक्ती दिसत आहे. सुरुवातीला अनेकांना तो हॉलीवूडमधील एखादा अभिनेता किंवा प्रोफेशनल फाइटर वाटला. मात्र नंतर समोर आलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती राम चरणचा पर्सनल बॉडीगार्ड असून तो आफ्रिकेतील प्रोफेशनल MMA फायटर आहे.

कोण आहे हा विदेशी बॉडीगार्ड?

या बॉडीगार्डचे नाव केविन कुंटो असून त्याचे खरे नाव अब्दू सोवे आहे. तो मूळचा गाम्बियाचा रहिवासी आहे. केविन हा आंतरराष्ट्रीय स्तरावर MMA म्हणजेच मिक्स्ड मार्शल आर्ट्स क्षेत्रात नावाजलेला फायटर मानला जातो. सध्या तो इटलीमध्ये वास्तव्यास असून तेथेच त्याने अनेक MMA स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले आहे.

MMA हा खेळ अत्यंत धोकादायक आणि कठीण मानला जातो. यात कराटे, बॉक्सिंग, कुस्ती, जिऊ-जित्सू आणि इतर अनेक फाइटिंग स्टाइल्सचा समावेश असतो. केविनच्या वेगवान आणि आक्रमक फाइटिंग स्टाइलमुळे तो विशेष प्रसिद्ध आहे. रिपोर्ट्सनुसार, तो अवघ्या 30 सेकंदांत जवळपास 15 किक मारू शकतो. त्यामुळे कोणत्याही धोकादायक परिस्थितीत समोरच्याला काही क्षणांत नियंत्रणात आणण्याची क्षमता त्याच्यात आहे.

एका दिवसासाठी घेतो 5 लाख रुपये

राम चरणने आपल्या सुरक्षेसाठी पारंपरिक बंदूकधारी सुरक्षारक्षकांऐवजी अशा प्रशिक्षित MMA फायटरची निवड केल्याने अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. विशेषतः मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, शूटिंग सेटवर किंवा चाहत्यांच्या गर्दीत राम चरणच्या सुरक्षेची जबाबदारी केविन सांभाळताना दिसतो.

केविन कुंटोच्या मानधनाचीही सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार, त्याला एका दिवसासाठी तब्बल 3 ते 5 लाख रुपये मानधन दिले जाते. सामान्य सुरक्षारक्षकांच्या तुलनेत ही रक्कम अनेक पटींनी जास्त आहे. त्यामुळे तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटी बॉडीगार्ड्सपैकी एक मानला जात आहे.

Follow Us
दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय...
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं..
पालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकाराली, नेमकं कारण काय?
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी..
खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? जरांगेंसोबत चर्चा
मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा? मनोज जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल