‘सौ देशों में बदनाम’… KINGचा टीझर रिलीज, तुफान अॅक्शन अन् शाहरुखचा खतरनाक फर्स्ट लूक समोर
शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त 'किंग' चित्रपटाचा टीझर व्हिडिओ रिलीज झाला आहे. यामध्ये शाहरुखचा खतरनाक फर्स्ट लूक आणि जबरदस्त ॲक्शन सीन्स पाहायला मिळतात. "सौ देशों में बदनाम" हा डायलॉग शाहरुखच्या भूमिकेची ओळख करून देतो. हा टीझर पाहूनप्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

शाहरुख खानचा आज (2 नोव्हेंबर 2025) वाढदिवस आहे. शाहरूखला त्याच्या करोडो चाहत्यांकडून शुभेच्छा मिळत आहेत. शाहरूखच्या वाढदिवसादिवशी दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित “किंग” चित्रपटाचा टायटल रिव्हील व्हिडिओ रिलीज केला. या टीझर व्हिडिओमध्ये चित्रपटातील काही प्रसंग दाखवण्यात आले आहेत. तसेच शाहरूखचा फर्स्ट लूकही दाखवण्यात आला आहे. त्याचा पहिला लूक हा खतरनाक असून त्याने केलेले अॅक्शन सीन्सही फार हटके आहेत. तसेच चित्रपटाची रिलीज डेटबद्दलही काही संकेतही देण्यात आले आहेत. सिद्धार्थ आनंद आणि शाहरुख खान यांनी यापूर्वी ब्लॉकबस्टर “पठाण” मध्ये एकत्र काम केले आहे.
जबरदस्त अॅक्शन अन्…
रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांच्या बॅनरखाली निर्मित, “किंग” 2026 मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात शाहरुख खानची एक वेगळंच रूप आणि भूमिका दाखवण्यात आली आहे. पुन्हा एकदा, किंग ऑफ रोमान्स पूर्ण अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे, जसे निर्मात्यांनी “किंग” च्या शीर्षकाच्या रिलीजमध्ये याची पुष्टी केली आहे. हा चित्रपट एक स्टाइलिश आणि जबरदस्त अॅक्शन एंटरटेनर असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून थ्रिलची एका वेगळ्या प्रकारे ओळख करून दिली आहे.
View this post on Instagram
किंग” चित्रपटाच्या टीझरमध्ये काय खास?
“किंग” चित्रपटाच्या टीझरमध्ये शाहरूखची भूमिका शक्तिशाली आणि उत्साही पद्धतीने मांडण्यात आली आहे. एक असे पात्र ज्याच्या नावामुळे दहशत निर्माण होते. दरम्यान यात दाखवण्यात आलेला एक डायलॉग शाहरूखच्या भूमिकेची जास्त ओळख करून देतो. तो डायलॉग म्हणजे “सौ देशों में बदनाम, दुनिया ने दिया सिर्फ एक ही नाम किंग” हा डायलॉग शाहरूखच्या त्या पात्राला अगदीच साजेसा असा घेतलेला आहे हे टीझर पाहून लक्षात येतं.
शाहरुख खानचा “किंग” कधी रिलीज होणार?
या चित्रपटातील त्याचा नवीन अन् हटके लूक म्हणजे, सिल्व्हर हेअर लूक, कानातले आणि स्टायलिश अंदाज. शाहरूखचा असा लूक यापूर्वी कधीही पाहिला गेला नसेल. हा लूक पूर्णपणे नवीन आणि वेगळा असून याच लूकने शाहरूखला प्रेक्षकांसमोर वेगळ्या रुपात सादर केलं आहे. “किंग” हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. पण त्याची नक्की तारीख अद्याप तरी समोर आलेली नाही.
