Video | अभिमन्यूला सोडून लतिका-दौलतची जमली जोडी, लाडक्या ‘सुंदरा’चा ‘वाथी कमिंग’ धमाल डान्स पाहिलात का?

‘लतिका’ साकारणाऱ्या अक्षयाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ‘दौलत’, ‘लतिका’, ‘आशू दादा’ डान्स करताना दिसत आहेत. ‘वाथी कमिंग’ या गाण्यावर डान्सचे चॅलेंज अनेक सेलिब्रिटींनी स्वीकारले आहे.

Video | अभिमन्यूला सोडून लतिका-दौलतची जमली जोडी, लाडक्या ‘सुंदरा’चा ‘वाथी कमिंग’ धमाल डान्स पाहिलात का?
सुंदरा मनामध्ये भरली

मुंबई : मालिकांच्या शर्यतीत बाजी मारणारी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (sundara manamadhe bharali ) ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील ‘लतिका’, ‘अभिमन्यू’, ‘दौलत’ या व्यक्तिरेखांसोबत इतर पात्रदेखील खूप गाजत आहेत. या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावरही बरेच चर्चेत आहेत. सोशल मीडियावर दरवेळी कोणते ना कोणते ट्रेंड सुरु असतातच. त्यापैकीच एक म्हणजे ‘वाथी कमिंग’ या गाण्यावर अनेकजण थिरकताना दिसत आहेत. हाच ट्रेंड फॉलो करत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील कलाकारही या ट्रेंडवर धमाल डान्स करताना दिसले आहेत (Star pravah sundara manamadhe bharali fame latika and daulat vaathi coming dance trend).

मालिकेत ‘लतिका’ साकारणाऱ्या अक्षयाने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ‘दौलत’, ‘लतिका’, ‘आशू दादा’ डान्स करताना दिसत आहेत. ‘वाथी कमिंग’ या गाण्यावर डान्सचे चॅलेंज अनेक सेलिब्रिटींनी स्वीकारले आहे. मालिकेच्या कथानकात दौलत आणि लतिका एकमेकांचे पक्के वैरी असले, तरी या व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांच्या साथीने धमाल डान्स करताना दिसले आहेत. या व्हिडीओत अभिमन्यू दिसत नसल्याने, प्रेक्षकांनी गमतीशीर प्रश्नही केले आहेत.

पाहा ‘सुंदरा’चा धमाल व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

काय आहे मालिकेचं कथानक?

सुंदर दिसणं ही प्रत्येकाचीच स्वाभाविक भावना आहे. परंतु, आजच्या काळात सौंदर्याची व्याख्या जरा बदलेली दिसते. म्हणतात ना ‘क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरूप’ अगदी तसंच काहीसं! जोडीदाराच्या बाबतीत अनेकांच्या अशाच काहीशा अपेक्षा असतात. अशाच एका लठ्ठ पण, गोड मुलीची दमदार गोष्ट ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत मांडण्यात येत आहे. मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक ‘लतिका’ची भूमिका आणि अभिनेता समीर परांजपे ‘अभिमन्यू’ची भूमिका सकारात आहेत (Star pravah sundara manamadhe bharali fame latika and daulat vaathi coming dance trend).

परस्पर विरोधी नायक-नायिका

लतिका उत्तम विनोदबुध्दी असलेली, खेळकर स्वभावाची, शाळेपासून अभ्यासात प्रचंड हुशार, उत्तम स्वयंपाक करणारी मुलगी आहे. इतकं सगळं असून देखील केवळ शरीराने लठ्ठ असल्याने लहानपणापासून तिला टोमणे ऐकावे लागले आहेत. याच एकमेव कारणामुळे तिचे लग्नदेखील जमत नव्हते. 34 स्थळांकडून नकार आल्यावर मात्र ती खचून जाते. सगळ्यांना आनंदी ठेवणारी, सुख– दु:खात साथ देणार्‍या लतिकाने या गोष्टीचा स्वीकार केला आहे आणि याचा तिला फारसा फरकही पडत नाही.

याउलट दिसायला देखणा, अंगापिडानं मजबूत, हुशार, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा असा अभिमन्यू आहे. स्वत: फिट असलेल्या अभिमन्यूला अख्ख्या गावाला ‘फिट’ करायचं आहे, म्हणून त्याला स्वत:ची व्यायामशाळा उघडायची आहे. या प्रवासात योगायोगाने लतिका-अभिमन्यूची लग्नगाठ बांधली जाते. अभिमन्यूचं स्वप्न आणि लतिकाचं लग्न यामध्ये दोघांच्या नशिबात काय नक्की काय लिहिलंय? आणि पुढे नेमकं काय घडणार, याची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

(Star pravah sundara manamadhe bharali fame latika and daulat vaathi coming dance trend)

हेही वाचा :

Rakhi Sawant | ‘लोक उगाच म्हणतात आम्ही कॉन्ट्रोवर्सी करतो!’, वॉर्डरोब मालफंक्शनला बळी पडलेली राखी संतापली, पाहा व्हिडीओ

पापा की परी, मराठी मालिकांवर अधिराज्य गाजवणारी गोड ‘व्हिलन’ ओळखलीत?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI