Video : अश्विन, कुलदीप आणि हार्दिकचा जबरदस्त डान्स, साऊथ इंडियन गाण्यावर धरला ताल

भारत आणि इंग्लंड संघ कसोटी मालिकेच्या तिसर्‍या सामन्यासाठी अहमदाबादला पोहोचले आहेत. तिसरी टेस्ट गुलाबी बॉलने खेळली जाईल. | India Vs England

Video : अश्विन, कुलदीप आणि हार्दिकचा जबरदस्त डान्स, साऊथ इंडियन गाण्यावर धरला ताल
हार्दिक, कुलदीप आणि अश्विन एका गीतावर थिरकताना...

मुंबईभारत विरुद्ध इंग्लंड (India Vs England) यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारताने 317 धावांनी जिंकला. यामुळे टीम इंडिया आनंदात आहे. खेळाडूही मजा मस्ती करतायत. तिसऱ्या मॅचसाठी अहमदाबादला पोहोचलेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी एका गाण्यावर ताल धरला. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. (india Vs England hardik pandya Kuldeep yadav And R Ashwin Dance On South Indian Song)

भारताचे एक नव्हे, दोन नव्हे तर तीन खेळाडूंनी अहमदाबादमध्ये चान्सवर डान्स मारला. या व्हिडीओत दुसऱ्या कसोटीचा मॅचविनर खेळाडू आर अश्विन (R Ashwin) जोरदार डान्स केलाय. अश्विनच्या साथीला हार्दिक पांड्या (hardik pandya) तसंच कुलदीप यादवने (Kuldeep yadav) आहेत ज्यांनी अश्विनच्या डान्सला टक्कर दिलीय.

वाथी कमिंग गाण्यावर खेळाडूंनी धरला ताल….

अश्विन, हार्दिक आणि कुलदीप यांनी ज्या गाण्यावर डान्स केलाय ते गाणं साऊथ इंडियन फिल्सचं गाणं आहे आणि गाण्याचे बोल आहेत वाथी कमिंग.. या व्हिडीओमधून दिसून येतंय की जीममध्ये गेल्यानंतर तसंच व्यायाम केल्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे.

सोशल मीडियावर डान्सचा जलवा

भारतीय संघाचे अनेक खेळाडू डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत अ्सतात. कधी विराट कोहली तर कधी शिखर धवन… आता आर अश्विन, कुलदीप आणि हार्दिकने डान्स करत चाहत्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashwin (@rashwin99)

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 24 फेब्रुवारीला सामना

भारत आणि इंग्लंड संघ कसोटी मालिकेच्या तिसर्‍या सामन्यासाठी अहमदाबादला पोहोचले आहेत. तिसरी टेस्ट गुलाबी बॉलने खेळली जाईल. 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये ही लढत होईल. मालिकेत 1-1 च्याअशी बरोबरी साधलेल्या दोन्ही संघांमध्ये ही मॅच मोठी चुरशीची होईल.

(india Vs England hardik pandya Kuldeep yadav And R Ashwin Dance On South Indian Song)

हे ही वाचा :

Happy Birthday Rohan Gavaskar | दिग्गज क्रिकेटपटूचा मुलगा, जो टीम इंडियाकडून खेळला पण भारतात नाही

Aakash Chopra | ….म्हणून मुंबई इंडियन्सने Arjun Tendulkar ला आपल्या ताफ्यात घेतलं, आकाश चोप्राने सांगितलं कारण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI