‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीच्या स्टायलिश हिल्स, किंमत ऐकून व्हाल हैराण!

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या दुबईत आहे. नोराने तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी नेहमीच फोटो शेअर करत असते.

'दिलबर गर्ल' नोरा फतेहीच्या स्टायलिश हिल्स, किंमत ऐकून व्हाल हैराण!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या दुबईत आहे. नोरा तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी नेहमीच फोटो शेअर करत असते. गेल्या काही दिवसांत नोराने बरेच फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. नोरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. तिने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने प्रीटेन्ड ड्रेस घातला आहे आणि यामध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे. (Stylish Hills of Nora Fatehi, do you know how much it costs?)

मात्र, या फोटोमध्ये नोराने घातलेल्या स्टायलिश हिल्सची किंमत ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. नोराच्या या स्टायलिश हिल्सची किंमत तब्बल 54,506 रुपये इतकी आहे. नोराने या फोटोत लाईट मेकअप केलेला दिसत आहे. तिने सोन्याची साखळी गळात घातली आहे ज्यामध्ये एक लहान लटकन दिसत आहे. नोराने दिलबर, ओ साकी-साकी, कमरिया यासारख्या हिट गाण्यांमध्ये डान्स केला आहे. लवकरच ती अभिषेक दूधियाच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात नोरा अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर सारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

करिना कपूर खानच्या चॅट शोमध्ये नोराने तिच्या मनातली इच्छा बोलून दाखवली होती. नोरा म्हणाली होती की, तैमुर मोठा झाला की, मी त्याच्यासोबत लग्न करणार आहे. हे नोराचे बोलणे ऐकून करिना आश्चर्यचकित झाली होती, करिना म्हणाली की, ठिक आहे पण तैमूर आता फक्त 4 वर्षाचा आहे त्याला लग्न करायला अजून बराच वेळ आहे. त्यावर नोरा हसत म्हणाली की, हरकत नाही तरीपण मी त्याच्यासाठी थांबेल.

नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेतर रेमो डिसूझाच्या ‘स्ट्रीट डांसर थ्रीडी’ चित्रपटात ती दिसली होती. अलीकडेच ती गुरु रंधावाच्या म्युझिक व्हिडिओ सिंगल ‘नाच मेरी राणी’ मध्येही दिसली.

संबंधित बातम्या : 

Adipurush | सैफ अली खान आणि प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे मोशन कॅप्चर सुरू!

अली अब्बासने माफी मागून काही फायदा नाही, तांडवविरोधात FIR दाखल!

Shocking | अजय देवगणचा दृश्यम पाहून तरुणाकडून गर्लफ्रेंडचा खून, कारण आलं समोर…

(Stylish Hills of Nora Fatehi, do you know how much it costs?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI