अली अब्बासने माफी मागून काही फायदा नाही, तांडवविरोधात FIR दाखल!

अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar)  दिग्दर्शित तांडव (Tandav)  वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

अली अब्बासने माफी मागून काही फायदा नाही, तांडवविरोधात FIR दाखल!
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 12:32 PM

मुंबई : अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar)  दिग्दर्शित तांडव (Tandav)  वेब सीरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एकापाठोपाठ एक वेब सीरीजच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या जात आहेत. सोमवारी अली अब्बास जफरने एक निवेदन करून माफी देखील मागितली पण असे असूनही अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता गौतम बुद्ध नगरातील रबुपुरा पोलिस स्टेशनमध्ये निर्माते आणि कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वेब सीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावल्या असून उत्तर प्रदेश पोलिसांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. (The controversy over the Tandav web series is not over)

ट्विटरवर एक निवेदन जारी करून अली अब्बास जफर यांनी सर्वांची माफी मागितली आहे. अली अब्बास जफर यांनी या वेब सीरीजचे दोन मुख्य भाग असल्याचं म्हटलं आहे. पहिला भाग डिस्क्लेमर सारखा आहे. तो सीरीज सुरू होण्यापूर्वी दाखवलेला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या भागात त्यांनी टीकेचा उल्लेख केला आहे. याच भागामुळे वाद निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ही वेब सीरीज पाहिल्यानंतर ज्या कुणी आक्षेप घेतला आहे, त्या सर्वांची माफी मागत असल्याचं जफर यांनी म्हटलं आहे. तांडव रिलीज झाल्यानंतर आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवून होतो. या सीरीजवरून आमची माहिती आणि प्रसारण मंत्रालायशी चर्चा झाली. त्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या सीरीजमुळे जनतेच्या भावना दुखावल्या असून त्यामुळे अनेक केसेस दाखल झाल्याचं आम्हाला सांगितलं.

निर्मात्याने काय म्हटलं

ही वेब सीरीज पूर्णपणे फिक्शन आहे. या सीरीजमधील घटनेचा कोणत्याही जिवीत व्यक्ती वा एखाद्या घटनेशी संबंध नाही. असलास तर तो योगायोग समजावा. कोणत्याही व्यक्ती, जाती, समुदाय आणि धार्मिक भावनांना ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सर्व तक्रारी समजून घेतल्या असून कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही सर्वांची विना अट माफी मागत आहोत, असं जफर यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या : 

Tandav | वादाचं ‘तांडव’ थांबणार?; वेब सीरिजच्या निर्मात्याची अखेर माफी

Shocking | अजय देवगणचा दृश्यम पाहून तरुणाकडून गर्लफ्रेंडचा खून, कारण आलं समोर…

(The controversy over the Tandav web series is not over)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.