AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priya Marathe : माझी बहीण लढवय्या होती, पण..; प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोधची भावूक पोस्ट

अभिनेता सुबोध भावेनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री आणि चुलत बहीण प्रिया मराठेच्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. प्रियाचं आज (रविवार) कॅन्सरने निधन झालं.

Priya Marathe : माझी बहीण लढवय्या होती, पण..; प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोधची भावूक पोस्ट
Subodh Bhave and Priya MaratheImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 31, 2025 | 2:03 PM
Share

अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या 38 व्या वर्षी कॅन्सरने निधन झालं. प्रियाच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती. तिच्या निधनानंतर अभिनेता सुबोध भावेनं सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. प्रिया ही सुबोधची चुलत बहीण होती. ‘माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली,’ अशा शब्दांत सुबोधने भावना व्यक्त केल्या आहेत.

सुबोध भावेची पोस्ट-

प्रिया मराठे, एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार. पण माझ्यासाठी त्याहीपेक्षा महत्त्वाचं नातं तिच्याबरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण. या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहेनत, कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या. प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली. काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका यामधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही,’ असं त्याने लिहिलंय.

”तू भेटशी नव्याने’ या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया तूला भावपूर्ण श्रद्धांजली. तू जिथे असशील तिथे तुला शांतता लाभावी हीच प्रार्थना,’ अशा शब्दांत सुबोधने शोक व्यक्त केला.

2023 मध्ये प्रियाने ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका मधेच सोडली होती. आरोग्याचं कारण देत तिने मालिकेचा निरोप घेत असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर ती सोशल मीडियावरही फार सक्रिय नव्हती. इन्स्टाग्रामवर प्रियाची वर्षभरापूर्वी शेवटची पोस्ट आहे.

प्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘चार दिवस सासूचे’मध्येही ती झळकली होती. त्यानंतर ‘कसम से’ या मालिकेतून तिने हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत तिने वर्षाची भूमिका साकारली होती. ‘बडे अच्छे लगते है’ या गाजलेल्या मालिकेत ती ज्योती मल्होत्राच्या भूमिकेत होती. प्रिया मराठेनं 24 एप्रिल 2012 रोजी अभिनेता शंतनू मोघेशी लग्न केलं होतं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.