Video: अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या अंगात आली देवी, पाहा भर कार्यक्रमात सर्वांसमोर काय झालं?
सध्या सोशल मीडियावर ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या अंगात देवी आल्याचे दिसत आहे.

आजकाल सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कलाकारांचे फोटो आणि व्हिडीओ तर कायमच व्हायरल होत असतात. मग हे व्हिडीओ त्यांच्या घरातील कार्यक्रमाचे असतील किंवा मग एअरपोर्टवरील लूक असतील. चाहत्यांना ते पाहायला आवडतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री सुधा चंद्रनचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या अंगात देवी आल्याचे दिसत आहेत.
काय आहे व्हिडीओ?
ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या मातेच्या चौकीत पोहोचल्या आहेत आणि तेथे काही लोकांनी त्यांना धरून ठेवले आहे. त्या शुद्धीत नसल्याचे दिसत आहे. एकीकडे भजन सुरु आहे तर दुसरीकडे त्यांच्या अंगात आल्याचे दिसत आहे. लोकांचे म्हणणे आहे की त्यांच्यावर माता राणी प्रसन्न झाली आहे, त्यामुळे त्यांच्या अंगात आले आहे. पण काही लोक याला नाटक आणि अभिनय म्हणत आहेत, जे खूप लाजिरवाणे आहे.
View this post on Instagram
व्हिडीओत सुधा चंद्रन पांढऱ्या आणि लाल रंगाच्या साडीत दिसत आहेत. त्यांनी कपाळावर एक पट्टी बांधली आहे ज्यावर ‘जय माता दी’ लिहिले आहे. एका क्लिपमध्ये त्या भक्ती गीतावर नाचताना दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांच्या अंगात देवी आल्याचे दिसत आहे. त्यांना तीन लोकांनी धरून ठेवावे आहे. जेणेकरून त्या कोणाला किंवा स्वतःला इजा पोहोचवू शकणार नाहीत.
सुधा चंद्रन यांच्यावर हसणाऱ्यांना युजर्सनी उत्तर दिले
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले आहे की, ‘नागिनचे ऑडिशन देत आहेत का.’ दुसऱ्या एका यूजरने म्हटले की, ‘अभिनयाची पातळी शिगेला पोहोचली आहे.’ तिसऱ्या एका यूजरने, ‘नेहमी ओव्हरअॅक्टिंग करते’ असे म्हटले आहे. एकाने लिहिले, ‘हे खरे आहे की शूटिंग चालू आहे.’ ‘कधीही हसू नये. चुकीची गोष्ट आहे. प्रत्येकाचा स्वतःचा धर्म आहे. तुम्ही देवावरच हसत आहात’, ‘जे कमेंटमध्ये हसत आहेत त्यांना कदाचित माहीत नाही की माता राणी आपल्या खऱ्या भक्तांमध्ये प्रवेश करते. जसे सुधा जींमध्ये माता राणी आल्या आहेत. जय माता दी’, ‘हे प्रायव्हेट क्षण आहेत, ते पब्लिकमध्ये पोस्ट करू नये’ अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
सुधा चंद्रन यांच्याविषयी
सुधा चंद्रन यांनी ‘कहीं किसी रोज’, ‘नागिन ६’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आणि ‘माता की चौकी – कलयुग में भक्ती की शक्ती’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. चित्रपट ‘नाचे मयूरी’ (१९८६) मधून त्यांना देशभरात ओळख मिळाली. त्यांनी असिस्टंट डायरेक्टर रवी डांग यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना मुल-बाळ नाही.
