Suhana Khan | ‘होय, माझी उंची 5’3 फूट, माझा रंग सावळा’; वर्णभेदाबद्दल सुहाना खानने दिलेल्या उत्तराची चर्चा

सुहाना नुकतीच 'मेबलिन' या ब्युटी ब्रँडची भारतीय ॲम्बेसेडर बनली आहे. 'द आर्चीज' या पहिल्या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Suhana Khan | 'होय, माझी उंची 5'3 फूट, माझा रंग सावळा'; वर्णभेदाबद्दल सुहाना खानने दिलेल्या उत्तराची चर्चा
Suhana KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 1:23 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘बादशाह’ अर्थात अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘द आर्चीस’ या चित्रपटातून ती इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवणार आहे. बॉलिवूड पदार्पणाआधीच सुहानाचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. विविध कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये तर कधी इतर स्टारकिड्ससोबत तिला पाहिलं जातं. सोशल मीडियावरही तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. सुहानाला अनेकदा तिच्या रंगावरून ट्रोल करण्यात आलं आहे. काही वर्षांपूर्वी तिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. आज (सोमवार) वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा तिच्या पोस्टची चर्चा होत आहे.

2020 मध्ये सुहानाने सोशल मीडियावर काही नकारात्मक आणि टीका करणारे कमेंट्स शेअर केले होते. दररोज अशा पद्धतीच्या कमेंट्सचा सामना करत असल्याचा खुलासा तिने केला होता. मात्र या ट्रोलिंगने खचून न जाता तिने चोख प्रत्युत्तर दिलं होतं. ‘सध्या बऱ्याच गोष्टी घडत आहेत, पण या एका समस्येचं निवारण करण्याची खूप गरज आहे. हे फक्त माझ्याबद्दलच नाही, तर त्या प्रत्येक मुला-मुलींबद्दल आहे, जे विनाकारण स्वत:बद्दल न्यूनगंड बाळगून मोठे होत आहेत. माझ्या दिसण्यावरून आलेले हे काही कमेंट्स मी इथे शेअर करतेय. माझ्या स्कीन टोनमुळे मी कुरूप दिसते, असं मोठ्या व्यक्तींकडून मला अनेकदा सांगण्यात आलंय. मी वयाच्या 12 वर्षांपासून अशा गोष्टी ऐकतेय’, असं ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलं, ‘टीका करणाऱ्यांबाबत निराशाजनक बाब म्हणजे आपण सर्वच जण भारतीय आहोत, त्यामुळे आपला वर्ण हा सावळाच असेल. होय आपला वर्ण इतरांपेक्षा वेगळाच असेल. मेलॅनिन या गोष्टीपासून तुम्ही स्वत:चा कितीही बचाव केला तरी त्यापासून तुम्ही दूर पळू शकत नाही. स्वत:च्याच देशातील लोकांच्या दिसण्यावरून टीका करत असाल तर तुम्ही फारच असुरक्षित आहात.’

उंची, वर्ण, सुंदरता या गोष्टींमागे न धावता आपण जसे आहोत तसं स्वीकारण्याचा संदेश तिने चाहत्यांना दिला. ‘सोशल मीडिया, भारतीय मॅचमेकिंग किंवा तुमचे स्वत:चे कुटुंबीय तुम्हाला हे स्वीकार करायला भाग पाडत असतील की तुम्ही 5’7 फूट उंट आणि गोरेपान नसाल तर सुंदर नाहीत, तर मला माफ करा. माझी उंची 5’3 फूट आहे, मी सावळी आहे आणि त्याबद्दल मी खूप खुश आहे. तुम्हीसुद्धा जसे आहात त्याबद्दल खुश राहा’, असं तिने पोस्टच्या अखेरीस लिहिलं.

सुहाना नुकतीच ‘मेबलिन’ या ब्युटी ब्रँडची भारतीय ॲम्बेसेडर बनली आहे. ‘द आर्चीज’ या पहिल्या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवी यांची मुलगी खुशी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.