Govinda Divorce: 38 वर्षाचं नातं मोडणार, गोविंदाला मोजाली लागणार मोठी रक्कम?

Govinda Divorce: गोविंदाच्या पत्नीने घटस्फोटासाठी कोर्टांच दाखल केला अर्ज, अभिनेत्याला मोजावी लागेल मोठी रक्कम? आकडा ऐकून व्हाल थक्क... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा यांच्या घटस्फोटाची चर्चा...

Govinda Divorce: 38 वर्षाचं नातं मोडणार, गोविंदाला मोजाली लागणार मोठी रक्कम?
फाईल फोटो
| Updated on: Aug 22, 2025 | 9:21 PM

Govinda Divorce: अभिनेता गोविंदा यांच्या आयुष्यात मोठं संकट आलं आहे. गोविंदा याची पत्नी सुनिता अहुजा हिने फार आधी हिंट दिली होती की, ती गोविंदा याच्यासोबत आनंदी नाही… सुनिता हिने यावर स्पष्ट वक्तव्य केलं नसलं तरी, लवकरच गोविंदा आणि सुनिता यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. आता गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. सुनिता हिने वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. ज्यामध्ये तिने पती गोविंदा याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहे…

लग्नाच्या 38 वर्षानंतर गोविंदा आणि सुनिता यांचं नातं अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. सांगायचं झालं तर, घटस्फोट आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण गोविंदा यांच्या घटस्फोटाची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अशात पोटगी म्हणून गोविंदा याला किती रक्कम मोजावी लागेल याची देखील चर्चा सध्या सुरु आहे.

सांगायचं झालं तर, कोर्टाने गोविंदा याला 25 मे रोजी समन्स पाठवला होता. पण गोविंदा कोणत्याच कार्यवाहीत प्रत्यक्ष उपस्थित राहिला नाही, त्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर सुनीता जून 2025 पासून प्रत्येक सुनावणी आणि न्यायालयीन कामकाजात उपस्थित राहिली आहे.

किती आहे गोविंदा यांची नेटवर्थ…

गोविंदा हिची संपत्ती जवळपास 150–170 कोटी इतकी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये जुहू येथील बंगला ‘जल दर्शन’ ज्याची किंमत 16 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.. शिवाय कोलकाता, रायगड आणि लखनऊ येथे देखील अभिनेत्याचे फार्महाऊस/फ्लॅट्स आहेत.

सुनिता हिला किती पैसे द्यावे लागतील…

घटस्फोट होत असताना पत्नीच्या खर्चासाठी पतीला रक्कम द्यावी लागते. ही रक्कम न्यायालयात किंवा कायद्यात निश्चित नाही. घटस्फोटाच्या बाबतीत, पत्नीला पोटगीचा अधिकार आहे, जो अनेक घटकांवर अवलंबून असतो. जर आपण जुन्या न्यायालयीन निर्णयांकडे पाहिलं तर, सामान्यतः पतीच्या उत्पन्नाच्या 25 टक्के पर्यंत पत्नीला कायमस्वरूपी भरणपोषण म्हणून निश्चित करू शकतात. जर पत्नीचं उत्पन्न देखील जास्त आहे तर, रक्कम काहीप्रमाणात कमी होऊ शकते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गोविंदा आणि सुनिता यांचा घटस्फोट झाला तर, गोविंदा 25 टक्क्यांच्या हिशोबाने सुनिता हिला 35 – 40 कोटी रुपये पोटगी म्हणून द्यावे लागतील… सध्या सर्वत्र गोविंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे.

सुनिता हिने गोविंदावर केले गंभीर आरोप…

सुनिता हिने वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. अर्ज दाखल करत तिने गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्याचे दुसऱ्या महिलांसोबत शारीरिक संबंध, फसवणूक, दुखावणे यांसारखे आरोप केले आहे. आता याप्रकरणी पुढे काय होतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.