Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadar 2 | रक्षाबंधनला ‘गदर 2’ची बंपर कमाई; सनी देओलने ‘पठाण’, ‘बाहुबली’ला केलं चितपट

सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. रक्षाबंधनच्या दिवशी प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्समध्ये तुफान गर्दी केली. त्यामुळे प्रदर्शनाच्या विसाव्या दिवशीही 'गदर 2'च्या कमाईची गाडी सुसाट पळतेय.

Gadar 2 | रक्षाबंधनला 'गदर 2'ची बंपर कमाई; सनी देओलने 'पठाण', 'बाहुबली'ला केलं चितपट
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 8:31 AM

मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाची तुफान क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. म्हणूनच रक्षाबंधननिमित्त पुन्हा एकदा थिएटरमध्ये सिनेरसिकांनी गर्दी केली. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नुकतेच थिएटरमध्ये वीस दिवस पूर्ण केले आहेत. विसाव्या दिवशी ‘गदर 2’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. सुट्टीचा दिवस असल्याने हा चित्रपट पाहण्याची संधी अनेकांनी सोडली नाही. म्हणूनच प्रदर्शनाच्या विसाव्या दिवशी या चित्रपटाने 19 व्या दिवसापेक्षा दुप्पट कमाई केली आहे. सनी देओलच्या या चित्रपटाने आता शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि प्रभासच्या ‘बाहुबली 2’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे. विसाव्या दिवशी या दोन्ही चित्रपटांची कमाई फार कमी होती. मात्र दुसरीकडे ‘गदर 2’ला अजूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

विसाव्या दिवशी जबरदस्त कमाई

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं होतं. म्हणूनच तब्बल 22 वर्षे उलटल्यानंतरही प्रेक्षकांना त्याच्या सीक्वेलविषयी फार उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या विसाव्या दिवशी ‘गदर 2’ने जवळपास दहा कोटी रुपये कमावले आहेत. ही कमाई 19 व्या दिवसापेक्षा दुप्पट आहे. आता तिसऱ्या आठवड्यात कमाईचा एकूण आकडा 500 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक व्यक्त करत आहेत.

‘पठाण’ आणि ‘बाहुबली 2’ला टाकलं मागे

शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने विसाव्या दिवशी फक्त 4.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसरीकडे प्रभासच्या ‘बाहुबली 2’ने विसाव्या दिवशी 6.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. या दोन्ही आकड्यांना सनी देओलच्या ‘गदर 2’ने मागे टाकलं आहे. चित्रपट निर्मात्यांनी रक्षाबंधनचं औचित्य साधत प्रेक्षकांना खास भेट दिली होती. त्याचाच फायदा चित्रपटाच्या कमाईत झाला. ‘गदर 2’च्या दोन तिकिटांसोबत आणखी दोन तिकिटं मोफत दिली आहे. ही ऑफर येत्या 3 सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे वीकेंडला कमाईचा आकडा आणखी वाढू शकतो.

हे सुद्धा वाचा

‘गदर 2’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर स्वातंत्र्यदिनी तब्बल 55 कोटी रुपयांची कमाई झाली होती. आतापर्यंत या चित्रपटाने देशभरात जवळपास 460 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. सनी देओलला बऱ्याच वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर एवढं मोठं यश मिळालं आहे.

'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?
'तुम्ही कितीही तारीफ करा.. तो फक्त वाट पाहातोय', शिरसाटांचा दावा काय?.
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव
...असं बोललो नाही, भास्कर जाधवांच्या मनात काय? आधी नाराजी मग सारवासारव.
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
चॉपरने केक कापणं बर्थडे बॉयच्या अंगाशी, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका
'संजय राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत'; भाजपच्या बड्या मंत्र्याची टीका.
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'
'शिवसेना अन् ठाकरेंचा संबंध नाही, एक दिवस असा असेल मातोश्रीत फक्त...'.
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....