AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Deol | अमृता सिंगबद्दल प्रश्न ऐकताच बदलले सनी देओलच्या चेहऱ्यावरील हावभाव; व्हिडीओ चर्चेत

अभिनेता सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या रिलेशनशिपबाबत अनेकदा चर्चा झाल्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनीला तिच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभावच बदलले.

Sunny Deol | अमृता सिंगबद्दल प्रश्न ऐकताच बदलले सनी देओलच्या चेहऱ्यावरील हावभाव; व्हिडीओ चर्चेत
सनी देओल, अमृता सिंगImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2023 | 10:32 AM
Share

मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : अभिनेता सनी देओलने ‘गदर 2’ या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केलं आहे. गेली बरेच वर्षे सनी देओलला इंडस्ट्रीत फारसं यश मिळत नव्हतं. मात्र ‘तारा सिंग’च्या भूमिकेतून त्याने कमाल करून दाखवली. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने गेल्या 25 दिवसांत दमदार कमाई केली. आता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘गदर 2’च्या कमाईचा वेग मंदावला. चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर सनीने विविध मुलाखती दिल्या आहेत. लवकरच तो रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात सनी देओलला त्याच्या करिअरविषयी आणि त्याचसोबत खासगी आयुष्याविषयी बरेच प्रश्न विचारण्यात आले.

सनी देओल भावूक

येत्या शनिवारी सनी देओलची ही मुलाखत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका प्रोमोमध्ये सनी देओल भावूक झाल्याचं पहायला मिळत आहे. स्टुडिओमध्ये प्रवेश करताच ज्याप्रकारे प्रेक्षक त्याचं टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करतात, ते पाहून सनी देओलचे डोळे पाणावतात. इंडस्ट्रीत गेली बरीच वर्षे निराशा हाती आल्यानंतर आता कुठे त्याला यश पहायला मिळतंय. त्यामुळे प्रेक्षकांकडून मिळणारं हे प्रेम पाहून तो भारावला. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ने आतापर्यंत 510 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.

अमृताबद्दलचा प्रश्न ऐकताच..

दुसऱ्या प्रोमोमध्ये सनी देओलला खासगी प्रश्न विचारला जातो. वडील आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी एकेकाळी सनी देओलच्या स्वभावाविषयी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख मुलाखतकर्ते करतात. “धरमजी एकदा म्हणाले होते, की तुम्ही कुटुंबातील साधू आहात”, असं ते म्हणतात. हे ऐकताच सनी देओलला हसू येतं. त्यानंतर पुढे रजत शर्मा म्हणतात, “धरमजी यांनी एका मुलाखतीत ‘बादल यूँ गरजता है’ या गाण्याविषयी वक्तव्य केलं होतं. त्यांनी तुम्हाला अमृता सिंगला मिठी मारण्यास सांगितलं होतं, पण तुम्ही तसं करू शकला नाहीत.” अमृता सिंगचं नाव ऐकताच सनी देओलच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. त्याचा चेहरा लाल होतो. पुढे तो नेमकं काय म्हणतो, हे ऐकण्यासाठी संपूर्ण मुलाखतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सनी देओल आणि अमृता सिंग हे एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते, अशी जोरदार चर्चा होती. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. सनीने पूजा देओलशी लग्न केलं. या दोघांना करण आणि राजवीर ही दोन मुलं आहेत. तर दुसरीकडे अमृताने अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं. अमृता आणि सैफला सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.