AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Deol आनंदाच्याभरात जमलेल्या सर्वांना दिली दारुची ऑफर; व्हिडीओ व्हायरल

'दारु पाहिजे...', अभिनेता सनी देओल याच्या कुटुंबात खास कारणामुळे अनंदाचं वातावरण; अभिनेत्याने आनंदाच्याभरात जमलेल्या सर्वांना दिली दारुची ऑफर; व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Sunny Deol आनंदाच्याभरात जमलेल्या सर्वांना दिली दारुची ऑफर; व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Jun 14, 2023 | 4:51 PM
Share

मुंबई | भिनेता सनी देओल गेल्या काही दिवसांपासून ‘गदर २’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाचं टीझर प्रदर्शित झालं आहे. अशात सिनेमाच्या टीझरचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ट्रेलर आणि सिनेमाबद्दल असलेली चाहत्यांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘गदर २’ सिनेमासोबतच अभिनेत्याच्या आयुष्यात आणखी एक आनंदाची बातमी आहे. सनी देओल याचा मुलगा करण देओल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्याच्या घरी लेकाच्या लग्नापूर्वीच्या विधी सुरु आहेत. सनी देओल याचा मुलगा करण देओल लवकरच लहानपणीची मैत्रीण दृशा आचर्य हिच्यासोबत लग्न करणार आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा सुरु आहे.

करण देओल आणि द्रिशा आचार्य यांचा रोका सोहळा १२ जून रोजी पार पडला. या सोहळ्यात देओल कुटुंबाव्यतिरिक्त इतर सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. सोहळा सुरु असताना सनीने जमलेल्या सर्वांसोबत संवाद साधला. तेव्हा सनी देओल आणि बॉबी देओल यांनी जमलेल्या सर्वांसोबत संवाद साधला. तेव्हा अभिनेत्याने सर्वांना जेवणाचं आवाहन केलं…

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

एवढंच नाही, आणखी काय हवंय विचारत सनीने दारू हवी आहे का? असं देखील सर्वांना विचारलं. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.. दारूची ऑफर अभिनेत्याने दुसऱ्या कोणाला नाही तर, चक्क पापाराझींना दिली…. सध्या सर्वत्र अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..

सनी, बॉबी आणि अभय देओलच्या चाहत्यांना या व्हिडिओला पसंती मिळत आहे. व्हिडीओवर कमेंट करत चाहते करणच्या लग्नाआधी सनी देओलच्या जुहूच्या बंगल्यावर लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. रोका सोहळ्याला फक्त जवळचे मित्र आणि कलाकारांचे कुटुंबीयच उपस्थित होते. सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सनी देओलचा आगामी सिनेमा…

अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल ‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘गदर २’मध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. सनी देओलच्या मुलाची भूमिका अभिनेता उत्कर्ष साकारणार आहे.

शूटिंगसाठी लखनऊ आणि महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये पाकिस्तानप्रमाणे सेट तयार करण्यात आला. गदर २ मधील पाकिस्तानच्या सीनसाठी लखनऊमध्ये तब्बल 50 दिवस शूटिंग करण्यात आली.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा