Sunny Deol | सेल्फी घेणाऱ्या चाहत्यावर भडकल्याच्या व्हिडीओवर अखेर सनी देओलने सोडलं मौन; म्हणाला..

काही दिवसांपूर्वी सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये एअरपोर्टवर एक चाहता त्याच्यासोबत सेल्फी क्लिक करण्यासाठी पुढे आला असताना सनी देओल त्याच्यावर भडकताना दिसला होता.

Sunny Deol | सेल्फी घेणाऱ्या चाहत्यावर भडकल्याच्या व्हिडीओवर अखेर सनी देओलने सोडलं मौन; म्हणाला..
Sunny Deol at airportImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 9:02 AM

मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला इंडस्ट्रीत यश मिळू लागलं, एखादा त्यांचा चित्रपट चांगली कामगिरी करू लागला की त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं जातं. अशा वेळी त्यांच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर नजर ठेवली जाते. ते इतरांशी कसे वागतात, कसे बोलतात, याकडे आवर्जून लक्ष दिलं जातं. त्यामुळे जर का त्या अभिनेत्याकडून किंवा अभिनेत्रीकडून छोटीशी जरी चूक झाली, तरी ते सोशल मीडियावर तुफान ट्रोल होतात. असंच काहीसं अभिनेता सनी देओलसोबत काही दिवसांपूर्वी घडलं होतं. ‘गदर 2’ या चित्रपटाच्या तुफान यशानंतर सनीचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. एअरपोर्टवर एक चाहता त्याच्याकडे सेल्फी क्लिक करण्यासाठी गेला होता, तेव्हा सनी देओल त्याच्यावर भडकल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावरून नेटकऱ्यांनी खूप टीका केली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने त्या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

व्हायरल व्हिडीओबद्दल काय म्हणाला सनी देओल?

युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत सनी देओल म्हणाला, “माझा तसा वागण्याचा काहीच हेतू नव्हता. अनेकदा अशा गोष्टी घडल्या आहेत ज्यामुळे मी दु:खी झालो पण मला पुढे चालत राहावं लागलं. अर्थातच चाहते तुमच्यावर प्रेम करतात आणि आम्हीसुद्धा त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतो. अनेकदा सेल्फी क्लिक करून झाल्यानंतर ते तिथून हलत नाही. अशा वेळी एखादी व्यक्ती मला रेकॉर्ड करतेय याचा विचार मी करत नाही. मला पुढे जाऊ द्या, इतकाच विचार माझ्या डोक्यात असतो. ही गोष्ट कृपया तुम्ही समजून घ्या. चाहत्यांसोबत माझं भावनिक कनेक्शन आहे. ”

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

“पुन्हा भेटल्यास मी त्याला मिठी मारेन आणि..”

यावेळी सनी देओलने असंही सांगितलं की त्याने काहीच चुकीचं केलं नाही. याउलट भविष्यात पुन्हा कधी तो चाहता भेटला तर तो त्याची प्रतिक्रिया वेगळी असेल. “मी त्याला मिठी मारेन आणि माझा तसा काहीच हेतू नव्हता असं मी त्याला सांगेन”, असं सनी देओलने स्पष्ट केलं. सनी देओल सध्या ‘गदर 2’ला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे यशाच्या शिखरावर आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा 460 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.

बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट
धनंजय मुंडेंना सरपंच हत्या प्रकरण भोवलं? बीड पालकमंत्रीपदाचा पत्ता कट.