सुपरस्टार महेश बाबूची पत्नी आहे ही मराठमोळी अभिनेत्री, लग्न करण्यापूर्वी ठेवली होती ही अट
साऊथचा सुपरस्टार महेश बाबू याचे सिनेमे अनेक लोकांनी पाहिले असतील. त्याचे जगभरात फॅन्स आहेत, त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. पण तुम्हाला माहित आहे की महेश बाबूची पत्नी एक मराठी अभिनेत्री आहे, मुंबईची राहणारी ही अभिनेत्री महेश बाबूच्या प्रेमात कशी पडली जाणून घ्या.
दक्षिण भारतातील स्टार महेश बाबू याची लोकप्रियता भरपूर आहे. जगभरात त्याचे चाहते आहेत. त्याने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. इककंच नाही तर त्याचे सिनेमा हिंदीत देखील डब झाले असून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तुम्हाला माहितीये का की या अभिनेत्याची पत्नी ही मराठमोळी अभिनेत्री आहे. महेश बाबुला प्रेमाने त्याचे चाहते प्रिन्स म्हणतात. अभिनेता त्याच्या लव्हस्टोरीसाठी देखील चर्चेत असतो. महेश बाबू अनेकदा त्याचे आणि पत्नीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. हे दोघेही 2000 मध्ये वामसी चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपाल बी. यांनी केले होते. पण अनेकांना माहित नाही की, दोघेही एकमेकांना पाहताच प्रेमात पडले होते. त्यांनी कधीही एकमेकांना याची कबुली दिली नव्हती. पण चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले होते.
नम्रता आणि महेशचे लग्न कधी झाले?
नम्रता शिरोडकर आणि महेश बाबू यांची लव्हस्टोरी खूप कमी लोकांना माहित आहे. नम्रता ही महेश बाबू पेक्षा वयाने 4 वर्षांनी मोठी आहे. सुरुवातीला महेश बाबु आणि नम्रता यांना लग्नासाठी कुटुंबातील व्यक्तींना लग्नासाठी तयार करण्यास अडचणी आल्या. पण नंतर सगळ्यांचा होकार आला. दोघांचा विवाह 10 फेब्रुवारी 2005 मध्ये झाला. महत्त्वाचे म्हणजे या लग्नाआधी नम्रताने महेश बाबुसमोर एक अट ठेवली होती.
नम्रता शिरोडकरने खुलासा केला होता की, महेश बाबूशी लग्न करून हैदराबादला शिफ्ट होण्यापूर्वी तिने अट ठेवली होती. नम्रताने सांगितले की, तिने महेश बाबूला बंगल्यात राहण्यापूर्वी नम्रतासोबत अपार्टमेंटमध्ये राहावे लागेल, अशी अट ठेवली होती.
का ठेवली होती ही अट
ही अट ऐकून तुम्हाला ही प्रश्न पडला असेल की, असं का. तर नम्रताने एका तेलुगु यूट्यूब चॅनलला सांगितले की, “मला मोठ्या घरात राहायची सवय नव्हती. त्यामुळे मला भीती वाटत होती. त्यामुळे लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा अपार्टमेंटमध्ये राहू असे ठरले होते. कारण मी मुंबईची आहे. मी या मोठ्या बंगल्यात कशी राहिल या भीतीने तो देखील माझ्यासोबत एका अपार्टमेंटमध्ये राहू लागला, माझी अट होती की मी हैदराबादला आली तर अपार्टमेंटमध्ये राहीन.”
View this post on Instagram
लग्नानंतर नम्रता शिरोडकर हिने वैयक्तिक आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. तिने चित्रपटांना अलविदा म्हटले. 2006 मध्ये तिने मुलगा गौतम कृष्ण याचे स्वागत केले. यानंतर 2012 मध्ये त्यांना मुलगी सितारा झाली. दोघेही आता वैवाहिक जीवनात आनंदी आहेत. महेश बाबू अजूनही सिनेमात काम करतो.