सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांकडून मोठी अपडेट समोर
Superstar Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांत यांना मध्यरात्री रुग्णालयात करण्यात आलं दाखल, डॉक्टरांकडून मोठी अपडेट समोर..., चाहत्यांकडून चिंता व्यक्त..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रजनीकांत यांच्या प्रकृतीची चर्चा...
Superstar Rajinikanth Health Update: सुपरस्टार रजनीकांत यांना 20 सप्टेंबर रोजी मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. रजनीकांत यांच्या पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्या काही चाचण्या होणार आहेत… असं देखील सांगण्यात येत आहे. रजनीकांत रुग्णालयात आहेत कळताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या सर्वत्र रजनीकांत यांच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.
रिपोर्टनुसार, 73 वर्षीय रजनीकांत यांच्यावर मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी हृदयाशी संबंधित काही शस्त्रक्रिया होणार आहेत. एएनआयनुसार, सोमवारी 30 सप्टेंबर रोजी रजनीकांत यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांच्या पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे… अशी माहिती डॉक्टरांकडून मिळाली आहे.
#WATCH | Chennai, Tamil Nadu: Visuals from outside the Apollo hospitals where Actor Rajinikanth was rushed to on Monday late night night.
Hospital sources have confirmed that Rajinikanth’s condition is stable. He was taken to the hospital after complaining of severe stomach… pic.twitter.com/t6xHSs2iur
— ANI (@ANI) October 1, 2024
यापूर्वी देखील रजनीकांत यांना करण्यात आलं होतं रुग्णालयात दाखल
सांगायचं झालं तर, 4 वर्षांपूर्वी उच्च रक्तदाब आणि थकव्यामुळे त्रास जाणवू लागला होता. ज्यामुळे रजनीकांत यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण रक्तदाब नियंत्रणात आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होत. तेव्हा डॉक्टरांनी रजनीकांत यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता.
रजनीकांत यांची किडनी ट्रांसप्लांट
रजनीकांत यांच्यावर 1 ऑक्टोबर रोजी हृदय शस्त्रक्रिया होणार आहे, मात्र त्यापूर्वी 2016 मध्ये त्यांनी किडनी ट्रांसप्लांट करण्यात आली होती. तेव्हा हैदराबादच्या अपोलो रुग्णालयाने त्यांना आठवडाभर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.
रजनीकांत यांचे आगामी सिनेमे
सुपरस्टार रजनीकांत आणि महानायक अमिताभ बच्चन ‘वेट्टै्यान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रॉडक्शन कंपनीने 73 व्या वाढदिवशी सिनेमाचा टीझर देखील प्रदर्शिक केला होता. सिनेमात फहद फासिल, राणा दग्गुबाती, रितिका सिंह, मंजू वारियर आणि दुशारा विजयन यांसारखे सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.