सूरज चव्हाणच्या वरातीत घडणार होतं भयंकर, शेकडो लोकांमध्ये क्षणात… हादरवणारा व्हिडीओ समोर!
सुरज चव्हाणचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. यावेळी त्यांची जंगी वरात काढण्यात आली. परंतु वरातीदरम्यान एक मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. परंतु सुदैवानी तसे काहाही घडले नाही.

Suraj Chavan Wedding : मराठी बिग बॉस सिझन 5 चा विजेता सूरज चव्हाणचे लग्न पार पडले. त्याच्या या विवाह सोहळ्याची राज्यभरात चर्चा आहे. संपत्ती, घर नसलेल्या या सुरज चव्हाणचे आज राज्यभरात लाखो फॅन्स आहेत. सुरजच्या याच चाहत्यांनी त्याच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. विशेष म्हणजे या विवाहाची जय्यत तयारी करण्यात आली होती. विवाहापूर्वी सूरज चव्हाणने घोडीवर बसून लग्न मंडपात धमाकेदार एन्ट्री केली. परंतु याच एन्ट्रीदरम्यान एक मोठा अनर्थ टळला.
जान्हवी किल्लेकरही उत्साहात लग्नात सहभागी
सुरज चव्हाणचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी त्याच्या गावातील नागरिक तसेच महाराष्ट्रभरातील त्याचे चाहते या विवाहाला पोहोचले होते. हळद समारंभही मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. विशेष म्हणजे लग्नासाठीही खास प्लॅनिंग करण्यात आले होते. या विवाहाला बिग बॉस सिझन 5 ची स्पर्धक जान्हवी किल्लेकर हिनेही उत्साहात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे सूरजला हळद लावण्यापासून ते वरातीत नाचण्यापर्यत जान्हवी दिसून आली. प्रत्यक्ष विवाहाच्या वेळी लग्नमंडपात शेकडो लोक जमा झाले होते. यावेळीच सुरज चव्हाण घोडीवर बसलेला असताना अजब घडलं.
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
लग्नाआधी सूरज चव्हाणची घोड्यावरून वरात काढण्यात आली. या वरातीदरम्यान सूरज चव्हाण नवरदेवाच्या गणवेशात राजेशाही थाडात आला होता. तो घाड्यावर बसून नाचताना दिसत होते. यावेळी घोडादेखील तालावर नाचायला लागला. आजूबाजूला मोठी गर्दी होती. या गर्दीमुळे घोडा थोडा गोंधळलेला दिसला. विशेष म्हणजे गाण्याच्या तालावर थिरकताना घोडा थोडा अनियंत्रित झाल्याचे पाहायला मिळाले. घोडा उंच उड्या घेत होता. यावेळी तोल जाऊ नये यासाठी सूरज चव्हाण स्वत:ला सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. याच गडबडीत सूरज चव्हाणच्या डोक्यावरील नवरदेवाचा फेटादेखील पडला. पण वेळीच सूरजने स्वत:ला सांभाळले. तसेच आजूबाजूच्या लोकांनीही घोड्याला उड्या मारू दिल्या नाहीत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घोडा उधळला असता तर कदाचित सूरज चव्हाण पडला असता, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु सुदैवाने कोणतीही अनूचित घटना घडली नाही आणि सूरजचे लग्न मोठ्या थाटात पार पडले.
