सुशांत सिंह राजपूतची बहीण म्हणाली, ‘मृत्यूनंतर एक वर्ष भावाची आत्मा…’, सांगितलं आता कुठे आहे भाऊ

Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणीकडून मोठा खुलासा, मृत्यूनंतर कशा परिस्थितीत होता अभिनेता, आता कुठे आहे सुशांत... बहिणीकडून मोठं सत्य समोर..., सुशांत याच्या निधनाला अनेक वर्ष उलटली आहेत, तरी देखील अभिनेत्याला विसरु शकलं नाही कुटुंबिय आणि चाहते...

सुशांत सिंह राजपूतची बहीण म्हणाली, 'मृत्यूनंतर एक वर्ष भावाची आत्मा...', सांगितलं आता कुठे आहे भाऊ
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 8:33 AM

मुंबई | 22 फेब्रुवारी 2024 : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची बहीण श्वेता सिंग प्रचंड धार्मिक आहे. भावाच्या मृत्यूचं सत्य श्वेता अद्यापही पचवू शकलेली नाही. भावाच्या मृत्यूचं दुःख पचवण्यासाठी श्वेता हिने विपश्यना पासून मेडिटेशनपर्यंत सर्व काही केलं. आता श्वेता हिने भावाच्या मृत्यूबद्दल मोठं सत्य सांगितलं आहे. मृत्यूनंतर एका वर्षापर्यंत सुशांत याची आत्मा त्रस्त होती असं अभिनेत्याच्या बहिणीने सांगितलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत श्वेता आनंदात म्हणाली सुशांत आता कैलास येथे आहे. ‘सुशांत कैलास येथे खास व्यक्तीसोबत आहे. सुशांत तेथून सर्वकाही पाहात आहे. तो तेथे आनंदी आहे. मी कैलासावर जाऊ शकत नाही, पण तो कैलासावर असं मला दिसलं आहे.’

‘सुशांत याच्या मृत्यूनंतर मला कायम वाटायचं तो दुःखी त्रस्त आहे. पण तो आता उत्तम ठिकाणी असल्याची जाणीव मला झाली आहे. सुशांत कैलासावर शिव यांच्यासोबत आहे. सुशांतच्या सर्व बाजूला फक्त सकारात्मक उर्जा आहे…’ असं देखील सुशांत याची बहीण म्हणाली.

सांगायचं झालं तर, आतापर्यंत श्वेता सिंह किर्ती हिला चाहते फक्त आणि फक्त सुशांत याची बहीण म्हणून ओळखत होते. पण आता श्वेता लेखक झाली आहे. श्वेता हिने ‘पेन’ (pain) नावाचं पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकात श्वेता हिने स्वतःची साधना आणि भक्तीच्या अनुभवावर पुस्तक लिहिलं आहे.

सोशल मीडियावर कायम सुशांत याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक महत्त्वाच्या क्षण चाहत्यांना सुशांत याची आठवण येते. 2020 मध्ये सुशांत याने वांद्रे येथील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. सुशांत याने स्वतःच आयुष्य संपवलं आणि बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली.

सुशांत याला ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. बॉलिवूडमध्ये देखील सुशांत याने स्वतःची ओळख निर्माण केली. आजही चाहते अभिनेत्याला विसरु शकलेले नाहीत.  सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांत याची चर्चा रंगलेली आहे.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.