AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्टीमध्ये सेलिब्रिटी घरुनच जेवून येतात? सुष्मिता सेनने सांगितला मजेदार किस्सा

Sushmita Sen : पार्टीमध्ये जेवणाच्या टेबल बसल्यानंतर सेलिब्रिटी कशी सुरु करतात जेवणाची सुरुवात? 'घरुन जेवून जा...' असं म्हणत सुष्मिता सेनने सांगितला मजेदार किस्सा, सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा...

पार्टीमध्ये सेलिब्रिटी घरुनच जेवून येतात? सुष्मिता सेनने सांगितला मजेदार किस्सा
| Updated on: Feb 19, 2024 | 2:38 PM
Share

मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : अभिनेता सुष्मिता सेन कायम बॉलिवूड विश्वातील रहस्यमय गोष्टी सांगत असते. सेलिब्रिटींच्या पार्टीमध्ये काय असते, पार्टी कशी असते, जेवणाच्या टेबलवर बसल्यानंतर सर्वांत आधी काय करायचं असतं… इत्यादी गोष्टी सुष्मिता हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सांगितल्या आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर माल इंग्लिश बोलता देखील येत नव्हतं… असं खुद्द सुष्मीता हिने सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुष्मिता सेश हिची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सुष्मिता हिने 29 वर्षांपूर्वी भारतासाठी मिस युनिव्हर्स किताब जिंकला होता. तेव्हा घडलेला एक मजेदार किस्सा अभिनेत्रीने सांगितला आहे. सेलिब्रिटी डिनर टेबलवर कसे वागतातय आणि काहीही माहिती नसलेल्या सुष्मिता हिची तेव्हा पंचायत झाली होती.

अभिनेत्री म्हणाली, ‘मिस युनिव्हर्स जिंगण्यापूर्वी मला टेबल मॅनर्स नव्हते. स्पर्धा जिंकल्यानंतर मला मेस्किको सीटीमध्ये पाठवण्यात आलं. मी 18 वर्षांची होती. मला योग्य प्रकारे इंग्लिश देखील बोलता येत नव्हतं. मी मेस्किकोमध्ये पोहोचली. माझी ट्रॅव्हल मॅनेजर माझ्यासोबत होती.’

‘मी, माझी ट्रॅव्हल मॅनेजर आणि इतर पुरुष होते. मला खूप भूक लागली होती. मी ट्रॅव्हल मॅनेजरला सांगितलं मला खूप भूक लागली आहे. तेव्हा ट्रॅव्हल मॅनेजर मला म्हणाली, ‘इतरांना देखील भूक लागली आहे. तू प्रमुख पाहुणी आहेस. तू जेवणाला सुरुवात केल्यानंतर सगळे जेवतील…”

पुढे सुष्मिता म्हणाली, ‘ट्रॅव्हल मॅनेजरमुळे मी सर्वकाही निभावू शकली. मला तेव्हा प्रचंड विचित्र वाटत होतं. पण मी एक गोष्ट शिकली. घरुन पोट भरुन जेवून निघा कारण कोणत्या पार्टीमध्ये गेल्यानंतर भूक लागणार नाही आणि तुम्ही बोलू शकाल मला भूक नाही. मी स्ट्रिक्ट डायटवर आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुष्मिता हिची चर्चा रंगली आहे.

सुष्मिता हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान पक्क केलं आहे. बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनोरंजन करणाऱ्या सुष्मिता हिने ओटीटीवर देखील पदार्पण केलं आहे. ‘आर्या’ वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

सोशल मीडियावर देखील  अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सुष्मिता कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो  आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.