कोण होता सुष्मिता सेनचा पहिला बॉयफ्रेंड? तिला ‘मिस युनिव्हर्स’ बनवण्यासाठी सोडलं करिअर, जिंकताच झाला ब्रेकअप
अभिनेत्री सुष्मिता सेनचं खासगी आयुष्य जणू एखाद्या खुल्या किताबाप्रमाणेच आहे. आजवर तिने अनेकांना डेट केलं. परंतु आजही तिच्यासाठी तिचं पहिलं प्रेम खूप खास आहे. एका मुलाखतीत सुष्मिता तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती.

‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकलेली अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या करिअरसोबतच खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत राहिली. सध्या तिचं नाव मॉडेल रोहमन शॉलशी जोडलं जातं. परंतु काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी ब्रेकअप जाहीर केला होता. ब्रेकअपनंतरही दोघांमधील मैत्रीने कायम अनेकांचं लक्ष वेधलं. सुष्मिताचं नाव अशा पद्धतीने एक-दोनदा नव्हे तर 11 वेळा रिलेशनशिप्समुळे चर्चेत राहिलंय. संजय नारंग, रणदीप हुडा, इम्तियाज खत्री आणि पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरम यांच्यासोबतही तिचं नाव जोडलं गेलंय. सुष्मिताने करिअरच्या सुरुवातीला दिग्दर्शक विक्रम भट्टला डेट केलं होतं. तेव्हा तो घटस्फोटीत होता. या दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. सुष्मिताच्या आयुष्यात आजवर अनेक जण आले आणि गेले असतील, परंतु तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडचं महत्त्व आजही तिच्या आयुष्यात कायम आहे. सुष्मिताने अनेकदा तिच्या मुलाखतींमध्ये याचा उल्लेख केला आहे.
फारुख शेख यांच्या ‘जीना इसी का नाम है’ या टॉक शोमध्ये सुष्मिता तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती. “मी आज जी कोणी आहे, ज्या ठिकाणी आहे, त्याचं सर्वांत मोठं श्रेय माझ्या पहिल्या बॉयफ्रेंडला जातं. मला मिस युनिव्हर्स बनवण्यासाठी त्याने त्याच्या स्वप्नांचा त्याग केला”, असं तिने सांगितलं. याविषयी ती पुढे म्हणाली, “माझ्या पहिल्या बॉयफ्रेंडचं नाव रजत होतं. माझ्या आयुष्यात त्याचं खूप महत्त्व आहे. मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर मला मिस युनिव्हर्सच्या प्रशिक्षणासाठी मुंबईला जायचं होतं. मुंबईचं नाव ऐकूनच मी खूप घाबरले होते. माझ्यासाठी ते परदेशासारखं होतं. कारण मी त्यावेळी दिल्लीच्या बाहेर कधीच गेले नव्हते. तेव्हा रजतने माझी साथ दिली आणि तो माझ्यासोबत मुंबईला आला.”
View this post on Instagram
“त्यावेळी रजन बेनेटन नावाच्या कंपनीत काम करत होता. त्याने त्याच्या कंपनीत एक महिन्याची सुट्टी मागितली होती. जर सुट्टी देऊ शकत नसाल तर तुम्हाला जे करायचं ते करा.. असं तो म्हणून माझ्यासोबत मुंबईला आला. अखेर त्याने नोकरी सोडली. माझ्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी त्याने स्वत:च्या स्वप्नांचा त्याग केला होता”, असा खुलासा सुष्मिताने केला.
‘मिड डे’ला दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मिता तिच्या ब्रेकअपविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. “मी रजतला सोडलं नव्हतं. अशा व्यक्तीला कोणी कसं सोडू शकतं? परंतु आयुष्यात आपण जसजसं पुढे जातो, तसतसे आपले मार्ग वेगळे होतात”, असं ती म्हणाली होती.
