AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुष्मिता सेनला मिस युनिव्हर्स बनवण्यासाठी पहिल्या बॉयफ्रेंडने मोजली मोठी किंमत, सत्य अखेर समोर

सुष्मिता सेनला मिळाला मिस युनिव्हर्सचा मान, पण त्यासाठी पहिल्या बॉयफ्रेंडने मोठी किंमत, सत्य अखेर समोर आलंच..., सुष्मिता हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण अभिनेत्रीच्या पहिल्या बॉयफ्रेंडबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे...

सुष्मिता सेनला मिस युनिव्हर्स बनवण्यासाठी पहिल्या बॉयफ्रेंडने मोजली मोठी किंमत, सत्य अखेर समोर
| Updated on: Mar 06, 2024 | 11:25 AM
Share

मुंबई | 6 मार्च 2024 : अभिनेत्री सुष्मिता सेन हिने 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आणि प्रसिद्धी झोतात आली. सुष्मिता फक्त तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने नाहीतर, बोलण्याच्या कौशल्यामुळे देखील चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान पक्क केलं. मिस युनिव्हर्स जिंकल्याच्या दोन वर्षांनंतर सुष्मिता हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सांगायचं झालं तर, सुष्मिता कायम स्वतःच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते. अभिनेत्रीने तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडबद्दल देखील मोठं सत्य चाहत्यांना सांगितलं.

एका मुलाखतीत सुष्मिता म्हणाली होती, ‘रजत तारा माझ्या पहिला बॉयफ्रेंड होता. त्याला मी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्यक्ती मानते. कारण मिस इंडिया जिंकली आणि मला मिस युनिव्हर्सच्या ट्रेनिंगसाठी मुंबईत यावं लागलं. तेव्हा मुंबई माझ्यासाठी परदेशाप्रमाणे होतं. कारण माझं बालपण दिल्लीत गेलं होतं.’

‘मुंबईत मला एकटीला यायचं नव्हतं. तेव्हा मझ्यासोबत येण्यासाठी रजत तारा याने स्वतःची नोकरी सोडली. रजत तेव्हा बेनेटनसाठी काम करायचा. त्याने महिनाभरासाठी सुट्टी मागितली होती. पण त्याला नोकरीवरून काढण्यात आलं.’

रजत याला नोकरीवरून काढल्यानंतर तो सुष्मितासोबत मुंबईत आला. ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत रजत याने सुष्मिताची साथ सोडली नाही. ‘तेव्हा रजत सोबत नसता तर मी मिस युनिव्हर्स जिंकू शकली नसती…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

सुष्मिता हिने आतापर्यंत अनेकांना डेट केलं आहे. उद्योजक ललित मोदी याच्यासोबत देखील सुष्मिता हिच्या नावाची चर्चा तुफान रंगली. सोशल मीडियावर दोघांचे खासगी फोटो देखील तुफान व्हायरल झाले. सध्या अभिनेत्री रोहमान शॉल याला डेट करत आहे. अनेक ठाकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं.

सुष्मिता हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत सोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अभिनेत्रीने लग्न न करता दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री दोन मुलींसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सामान्य कुटुंबातील असलेल्या सुष्मिता हिने मोठी स्वप्न पाहिली आणि की स्वप्न पूर्ण केली. सुष्मिता हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत सुष्मिता हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सुष्मिताचा बोलबाला असतो.

Follow Us
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी सांगितली 2024 मधील ती गोष्ट
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
Sanjay Raut | कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा वाजवत बसतील; राऊतांनी उडवली खिल्ली
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
Omraje Nimbalkar | 20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मोठा निकाल; ओमराजे मुंबईच्या दिशेने रवाना
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल