AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या लाडक्या बहिणीची पतीने सोडली साथ, अभिनेता ‘या’ महिलेसोबत थाटणार दुसरा संसार

सलमान खानच्या बहिणीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर, पती थाटतोय दुसऱ्या महिलेसोबत संसार, लग्नाची पत्रिका समोर... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या बहिणीच्या पहिल्या पतीच्या खासगी आयुष्याची चर्चा..

सलमान खानच्या लाडक्या बहिणीची पतीने सोडली साथ, अभिनेता 'या' महिलेसोबत थाटणार दुसरा संसार
| Updated on: Mar 06, 2024 | 10:18 AM
Share

मुंबई | 6 मार्च 2024 : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अभिनेता सलमान खान याची मानलेली बहीण श्वेता रोहिरा हिच्या खासगी आयुष्यात मोठं संकट आलं आहे. श्वेता हिचा पती आणि अभिनेता पुलकित सम्राट नवीन संसार थाटण्याच्या तयारीत आहे. सलमान खान याच्या बहिणीची साथ सोडत पुलकित अभिनेत्री कृती खरबंदा हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पुलकित आणि कृती यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. दोघांच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त पुलकित आणि कृती यांच्या लग्नाच्या पत्रिकेची चर्चा रंगली आहे. पत्रिकेत कपलचं कोलाज करण्यात आलं आहे. ‘आपल्या लोकांसोबत आनंद साजरण्यासाठी आता आणखी प्रतीक्षा करु शकत नाही…’ असं देखील पत्रिकेत लिहिलं आहे. लग्नाची तारीख देखील ठरवण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, पुलकित आणि कृती 13 मार्च 2024 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांनी लग्नाची तयारी देखील सुरु केली आहे. एका आठवड्यानंतर पुलकित आणि कृती दोघे नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

पुलकित आणि कृती गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एवढंच नाहीतर, जानेवारी महिन्यात दोघांचा रोका (साखरपुड्याआधी होणारी विधी) देखील झाला आहे. या कार्यक्रमात फक्त पुलकित आणि कृती यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

पुलकित सम्राट याचं पहिलं लग्न

पुलकित सम्राट याचं पहिलं लग्न सलमान खान याची मानलेली बहीण श्वेता रोहिरा हिच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये पुलकित आणि श्वेता यांनी लग्न केलं होतं. त्यानंतर 2015 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. फक्त एक वर्ष दोघांचं लग्न टिकलं. खुद्द सलमान खान याने श्वेताच्या लग्नाची तयारी केली होती.

पुलकित सम्राट याच्याबद्दल सांगायचं झालं तर, पुलकित बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘फुकरे’, ‘पागलपंती’, ‘समन रे’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये पुलकित याने महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेता कायम सक्रिय असतो.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.