Maula : सुष्मिता सेनकडून बॉयफ्रेंड रोहमनवर शुभेच्छांचा वर्षाव, रोहमनच्या ‘मौला’ गाण्याचा टीझर रिलीज

सुष्मिता सेननं इन्स्टाग्राम स्टोरीवरुन बॉयफ्रेंड रोहमनवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Sushmita Sen showers good wishes on boyfriend Rohman)

  • Updated On - 12:18 pm, Wed, 23 December 20
Maula : सुष्मिता सेनकडून बॉयफ्रेंड रोहमनवर शुभेच्छांचा वर्षाव, रोहमनच्या 'मौला' गाण्याचा टीझर रिलीज

मुंबई : सुष्मिता सेन आणि रोहमन शाल यांची जोडी बॉलीवूडमधील क्यूट जोडप्यांपैकी एक आहे. दोघंही आपल्या नात्याबद्दल खुलेआम बोलताना दिसतात. तसेच, चांगल्या कामासाठी एकमेकांचं कौतुक करण्यास कधीच विसरत नाहीत. रोहमननं एका संगीत व्हिडिओमध्यू डेब्यू केला आहे. या गाण्यात तो एरिका फर्नांडिससोबत दिसला आहे. मंगळवारी रोहमननं गाण्याचं टीझर शेअर केलंय.

रोहमन आणि एरिकाच्या या गाण्याचं नाव आहे ‘मौला’ असं आहे. मौलाच्या टीझरनंतर सुष्मितानं रोहमनसाठी खूप खास पोस्ट शेअर केली आहे. ‘तुझ्यावर अभिमान आहे जान’ असं कॅप्शन देत तिनं इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by rohman shawl (@rohmanshawl)

‘पॅपोन मी तुमच्या आवाजाचा खूप मोठा चाहता आहे आणि मी या व्हिडिओमध्ये झळकणार आहे यापेक्षा अधिक आनंद काय असू शकतो. हा एक मस्त अनुभव होता. उत्तम को-स्टार एरिका फर्नांडिस यांचेसुद्धा आभार. हे गाणं लवकरच रिलीज होणार आहे. माझ्याबरोबर नेहमीच खंबीर उभं राहिल्याबद्दल सुष्मिताचे आभार. मला रोमँटिक गाणं करण्यास परवानगी दिल्याबद्दल अलीशा आणि रेने तुमचेही धन्यवाद.’

सुष्मिता आणि रोहमनच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता
अभिनेत्री सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल हे दोघं गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे दोघं त्यांच्या मुली रेनी आणि अलीशासोबत बाहेर फिरताना दिसतात.सुष्मिता सेन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे ती नेहमी बॉयफ्रेंड रोहमनसोबतचे फोटो शेअर करत असते. चाहत्यांना नेहमीच या दोघांच्या लग्नाची उत्सुकता असते.

एकदा एका चाहत्यानं ‘तुम्ही लग्न कधी करणार ?’ असा प्रश्न केला असता सुष्मितानं त्यावर रोहमनकडे हसून बघतं त्याला प्रश्न केला.. ‘आपण लग्न कधी करणार ?’ रोहननही त्यावर उत्तर दिलं, ‘ विचारुन सांगतो…’ यावर सुष्मितानंही हसत हसतच ‘शेजाऱ्यांना विचारून सांगते’ असं उत्तर दिलं होतं. सुष्मिताच्या या उत्तराने दोघांनाही हसू आवरेनासे झाले आणि त्यांनी खळखळून हसायला सुरुवात केली. हे सगळं तिच्या इन्स्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओदरम्यान घडलं होतं.

संबंधित बातम्या

Wrap Up : ‘चंदीगड करे आशिकी’चं चित्रीकरण संपलं, वाणी आणि आयुष्मान खुरानानं केले फोटो शेअर

Haryanvi Song | हरयाणाची नवी सपना चौधरी बघितली का? इंटरनेटवर धूमाकूळ

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI