Haryanvi Song | हरयाणाची नवी सपना चौधरी बघितली का? इंटरनेटवर धूमाकूळ

सपना चौधरी म्हटले की, आपल्याला लगेच तिचा डान्स आठवतो. हरयाणी गाण्यांबद्दल बोलताना प्रथम सपना चौधरीचेच नाव आठवते.

Haryanvi Song | हरयाणाची नवी सपना चौधरी बघितली का? इंटरनेटवर धूमाकूळ

मुंबई : सपना चौधरी (Sapna Choudhary) म्हटले की, आपल्याला लगेच तिचा डान्स आठवतो. सपना चौधरीने बॉलिवूड, पंजाबी आणि भोजपुरी या तिन्ही इंडस्ट्री प्रवेश केला आहे. तिचे कोणतेही गाणे रिलीज होताच व्हायरल होते. कोट्यावधी लोक तिला फॉलो करतात. पण आता आणखी एक हरयाणी स्टार सपनाशी स्पर्धा करण्यासाठी आली आहे. तिचे गाणे रिलीज होताच ट्रेंडिंग लिस्टमध्ये येते. (Pranjal Dahiyal’s song from Haryana gets millions of views as soon it is released)

या हरयाणाच्या स्टारचे नाव प्रांजल दहिया (Pranjal Dahiya) असे आहे. प्रांजलची देखील सर्व गाणी रिलीज होताच जोरदार व्हायरल होतात. ती आपल्या डान्सने आणि नखऱ्याने सर्वांची मने जिंकत आहे. प्रांजलचे नुकतेच रिलीज झालेले ’52 गज का दामन’ या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं आहे. हे गाणे आतापर्यंत 22 कोटी लोकांनी पाहिले आहे.

प्रांजल एक टिकटॉक स्टार आहे. सुप्रसिद्ध अक्की कल्याणचे गाणे HM6 काम करण्याची संधी प्रांजल मिळाली. यानंतर तिने पंजाबी इंडस्ट्रीमध्येही काम केले. पण प्रांजलला हरयाणी इंडस्ट्रीकडून खरी संधी मिळाली आहे. ‘जूती काली’, ‘बाजीगर’ आणि ‘नाचूंगी डीजे फ्लोर पे’ गाने रिलीज झाले आहेत.
प्रांजलला प्रेक्षकांकडून सध्या खूप प्रेम मिळत आहे. तिचे प्रत्येक गाणे रिलीज होताच सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. तिचे गाणे रिलीज होताच कोट्यवधी व्यूज मिळतात.

हरियाणाची स्टार सपना चौधरीने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही बातमी ऐकून तिचे चाहते जवढे आनंदी आहेत होते. तेवढेच चकीतही झाले होते. कारण गुपचूप लग्न केल्यानंतर सपनाने तिची प्रेग्नेंसीही सिक्रेट ठेवली होती. मात्र, इंडस्ट्रीमध्ये हे पहिल्यांदा झालेलं नाही. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या प्रेग्नेंसीचं गुपित ठेवले होते.

संबंधित बातम्या : 

Trouble | संजय लीला भन्साळीचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, शूटिंग थांबण्याची शक्यता!

मोदींना टॅग करत करण जोहरने केली मोठी घोषणा, सरकारला खूश करण्याचा प्लॅन ?

(Pranjal Dahiyal’s song from Haryana gets millions of views as soon it is released)

Published On - 11:15 am, Wed, 23 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI