मोदींना टॅग करत करण जोहरने केली मोठी घोषणा, सरकारला खूश करण्याचा प्लॅन ?

मोदींना टॅग करत करण जोहरने केली मोठी घोषणा, सरकारला खूश करण्याचा प्लॅन ?

बॉलिवूड चित्रपटांचे निर्माते करण जोहरने आज एक मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्यावर एक एपिक सीरीज बनवणार आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Dec 22, 2020 | 5:36 PM

मुंबई : बॉलिवूड चित्रपटांचे निर्माता करण जोहरने आज एक मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्यावर एक एपिक सीरीज बनवणार आहे. ज्याची थीम #ChangeWithin असेल या प्रोजेक्टसाठी चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी, दिनेश विजन आणि महावीर जैन देखील सोबत असल्याची माहिती करण जोहरने ट्वीट करून दिली आहे आणि हे ट्विट करणने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केले आहे. (Karan Johar made a big announcement)

करण जोहर नेहमीच त्याच्या मोठ्या प्रोजेक्टसाठी ओळखला जातो, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिकेतील ब्रह्मास्त्र हा चित्रपट 300 कोटींच्या बजेटच्या वर गेला आहे. या व्यतिरिक्त, जुग जुग जिओ, तख्त, शहशाह, रणभूमी, सूर्यवंशी, दीपिका आणि 2021 मध्ये येणार आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या करणने या मोठ्या प्रकल्पाची घोषणा करून सर्वांना चकित केले आहे.

2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होतील. देश स्वातंत्र्याची 75 वर्ष मोठ्या उत्सवात साजरे करणार असे मोदींनी आपल्या भाषणांमध्ये बर्‍याच वेळा बोलून देखील दाखवले होते. अर्थात त्यासाठी मोठी तयारी केली जाईल. बॉलिवूड यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम करेल. यातील एक प्रकल्प करणचा देखील असेल. जे नेटफ्लिक्स सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाऊ शकतो.

करण एनसीबीच्या रडारावर नुकताच करण जोहरला एनसीबीमध्ये एका व्हायरल व्हिडिओला उत्तर मागितले होते. एनसीबीला वाटत आहे की, करणच्या त्या पार्टीत ड्रग्स घेण्यात आले होते. याचे स्पष्टीकरण करणकडून मागविण्यात आले आहे. या पार्टी दीपिका, वरुण धवन, विक्की कौशल, अर्जुन कपूर यासारख्या बड्या स्टार्सचा समावेश होता. अशा परिस्थितीत ही घोषणा सरकारला खूश करण्याची तर नाहीना असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु एनसीबी ज्या प्रकारे ड्रग्ज प्रकरणाची कठोरपणे चौकशी करीत आहे, असे वाटत आहे की, सत्य लवकरच बाहेर येईल.

संबंधित बातम्या : 

Sussanne Khan | हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानविरोधात गुन्हा

Khyaal Rakhya Kar | ‘ख्याल रखया कर’ गाण्यांत नेहा आणि रोहनप्रीतच्या क्यूट केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली!

(Karan Johar made a big announcement)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें