Taapsee Pannu | तापसी पन्नू हिने सांगितले बाॅलिवूडमधील काळे सत्य, गटबाजीवर मोठे भाष्य
बाॅलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. तापसी पन्नू हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. विशेष म्हणजे तापसी पन्नू हिची मोठी फॅन फाॅलोइंग ही देखील सोशल मीडियावर बघायला मिळते.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तापसी पन्नू हिने आता नुकताच बाॅलिवूडमध्ये 10 वर्षे पूर्णे केले आहे. अनेक हीट चित्रपटांमध्ये तापसी पन्नू हिने महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. विशेष म्हणजे तापसी पन्नू हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. तापसी पन्नू ही सोशल मीडियावरही चांगलची सक्रिय दिसते. तापसी पन्नू हिने आपल्या करिअरची सुरूवात ही चश्मे बद्दूर चित्रपटाने (Movie) केलीये. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमुळे तापसी पन्नू ही प्रचंड चर्चेत आलीये. या मुलाखतीमध्ये तापसी पन्नू हिने काही अत्यंत मोठे खुलासे हे केले आहेत. तापसी पन्नू हिचे भाष्य ऐकून अनेकांना मोठा धक्का बसलाय.
तापसी पन्नू हिने बाॅलिवूडमधील ज्वलंत विषय म्हणजे नेपोटिझमवर देखील भाष्य केले आहे. तापसी पन्नू हिने या मुलाखतीमध्ये बाॅलिवूडमधील काही गुपिते देखील उघड केली आहेत. तापसी पन्नू ही म्हणाली की, मी बाॅलिवूडमध्ये येण्याच्या अगोदरच मला हे माहिती होते की, इथे नेपोटिझम आणि गटबाजी मोठ्या प्रमाणात चालते.
मला हे सर्व माहिती असताना देखील मी या क्षेत्रामध्ये आले. याचा अर्थ जी काही परिस्थिती आपल्यासमोर असेल त्याचा सामना करायचे हे मी ठरवलेच होते. मुळात म्हणजे आपण असे ठवायचेच नाही की, परिस्थिती ही आपल्या बाजुने असेल म्हणजे आपली मानसिकता अजून नक्कीच वेगळी होते आणि हेच ठरवून मी बाॅलिवूडमध्ये आलीये.
या मुलाखतीमध्ये तापसी पन्नू ही बाॅलिवूडमधील गटबाजीबद्दल बोलताना दिसली आहे. तापसी पन्नू म्हणाली की, प्रत्येकाला आपण कोणासोबत काम करायला हवे आणि कोणासोबत काम नाही करायचे हे ठरवण्याचा अधिकार नक्कीच आहे. मला माहिती होते की, इथे भेदभाव नक्कीच होणार आहे तरीही मी इकडे आले मग तक्रार नेमकी कोणाकडे करायचे?
आता तापसी पन्नू हिच्या मुलाखतीनंतर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. मुळात म्हणजे या मुलाखतीमध्ये तापसी पन्नू हिने कोणाचे देखील नाव घेतले नाही किंवा आरोप केले नाहीत. फक्त बाॅलिवूडमध्ये काय घडले हे सांगताना तापसी पन्नू ही दिसली. इतकेच नाही तर याबद्दलची कल्पना आपल्याला अगोदरच असल्याचे देखील सांगताना तापसी पन्नू ही दिसत आहे.
