AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगनाशी पंगा, मोदी सरकारविरोधी भूमिका, तापसीच्या धाडीचं राजकीय कनेक्शन? किती कमाई? वाचा सविस्तर

अनुरागच्या चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री तापसी पन्नू देखील इन्कमटॅक्सच्या रडारावर आली आहे.

कंगनाशी पंगा, मोदी सरकारविरोधी भूमिका, तापसीच्या धाडीचं राजकीय कनेक्शन? किती कमाई? वाचा सविस्तर
तापसी पन्नू
| Updated on: Mar 03, 2021 | 3:19 PM
Share

मुंबई : आयकर विभाग अर्थात इन्कम टॅक्सने (Income tax raid) आता आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवल्याचं दिसत आहे. कारण इन्कम टॅक्सने मुंबईत अनेक बॉलिवूडकरांवर धाडी टाकल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू (Taapasee Pannu), दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि ‘क्वीन’चा निर्माता विकास बहलच्या घरी इनकम टॅक्स विभागाने धाड टाकली आहे. या बड्या कलाकारांनी कर चुकवल्याचे म्हटले जात आहे (Taapsee Pannu net worth and clashes know about her income).

मुंबईत अनेक ठिकाणी हे धाडसत्र सुरु आहे. अचानक पडलेल्या या धाडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, यात अनुरागच्या कंपूकडे लक्ष वेधले जात आहे. अनुरागच्या चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री तापसी पन्नू देखील इन्कमटॅक्सच्या रडारावर आली आहे.

तापसीचे करिअर

तिने ‘मिस इंडिया 2008’मध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तिने ‘पॅंटालून फेमिना मिस फ्रेश फेस’ आणि ‘साफी फेमिना मिस ब्यूटीफुल स्किन’ हे  किताब जिंकले होते. तिने बर्‍याच प्रिंट शूट आणि टीव्हीसीच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे.

के. राघवेंद्र राव यांच्या 2010मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झुमंडी नाडम’ या चित्रपटातून तापसीने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. पारंपारिक तेलुगु संगीताचे प्रशिक्षण घेण्यासाठी भारतात आलेल्या अमेरिकेतील टायकूनच्या छोट्या मुलीचीही भूमिका तिने साकारली होती. तापसीने बॉलिवूडमध्ये पाय ठेवल्यापासून वेगवेगळ्या भूमिका करत बहार उडवून दिली आहे. तिने केलेल्या दमदार हाणामारीच्या भूमिकाही चांगल्याच गाजल्या आहेत. त्याच बरोबर तिचा ‘पिंक’ हा चित्रपट तर तिच्या आणि अमिताभच्या जुगलबंदीसाठी नक्कीच बघावा असा आहे.  अक्षय कुमार सोबत नीरज पांडे यांच्या ‘बेबी’ चित्रपटात तिने अभिनय केला. बॉलिवूड मधील ‘पिंक’, ‘बेबी’, ‘सांड की आंख’, ‘थप्पड’ हे चित्रपट देखील खूप गाजले.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हीच्याकडे सध्या चित्रपटांची रंग आहे. ती लवकरच ‘लूट लपेटा’मध्ये दिसणार आहे. तापसीने ‘लूट लपेटा’मधील आपला पहिला लूक शेअर केला आहे. तिच्या या पात्राचे नाव ‘सावी’ आहे. यापूर्वी अनुराग कश्यप समवेत अभिनेत्री तापसी पन्नूने ‘मनमर्जिया’ नावाचा चित्रपट केला आहे. ती या काळात टाईम ट्रॅव्हलवर आधारित दुसर्‍या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे (Taapsee Pannu net worth and clashes know about her income).

तपासीची कमाई किती?

तापसीच्या नावे एकूण संपत्ती 42.5 कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे, असा अंदाज आहे. ती एका चित्रपटासाठी किमान 80 लाख ते 1.5 कोटी रुपये इतके मानधन आकारते. तापसी पन्नूने नुकतेच मुंबईच्या पॉश भागात लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. तिचे चेन्नई आणि हैदराबाद येथे देखील घरे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तापसीकडे बीएमडब्ल्यू 5 सीरीज, मर्सिडीज एसयूव्ही आणि एक रेनॉल्ट कॅप्चर कार यासारख्या गाड्या आहेत.

तापसीचा कंगनाशी पंगा!

कंगना प्रत्येक विषयावर तिचे मत मांडत असते. शेतकरी आंदोलनादरम्यान मोदी सरकारच्या विरोधात मत मांडत, ‘दुसऱ्यांना शिकवण्यापेक्षा स्वत:चा विश्वास बळकट करा’, असे ट्विट करुन तापसीने रिहानावर टिका करण्यांना चांगलाच टोला लगावला. विषय कोणताही असो त्यात कंगना काही बोलणार नाही, असे होत नाही. तापसीच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर तापसी विरुद्धा कंगना असे ट्विटर वॉर रंगलेले पहायला मिळाले.

तापसीने नाव घेता केलेल्या ट्विटवर कंगना चांगलीच भडकली. तिने थेट तापसीवर हल्लाबोल केला. कंगनानं तापसीला ‘बी ग्रे’ड म्हटले. त्यानंतर आता तापसीने कंगनावर निशाणा साधत कंगनाच्या डीएनमध्येच विष आहे, असे तापसीने म्हटले. तिच्या ट्विटचे उत्तर देताना तापसीने असे म्हणले आहे की,’सोशल मीडियावर आपले विचार मांडायचा जर कोणाला अधिकार असेल, तर ती फक्त कंगना रनौत आहे. तिच्या डीएनएमध्येच विष आणि शिव्या भरल्या आहेत’,असे सडेतोड उत्तर तापसीने कंगनाला दिले होते.

(Taapsee Pannu net worth and clashes know about her income)

हेही वाचा :

मोदी सरकारचा विरोध महागात पडतोय अनुराग कश्यपला की खरोखरच टॅक्स चोरी? वाचा सविस्तर

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.