AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC: न्यूयॉर्कच्या गगनचुंबी इमारतीवर ‘तारक मेहता’ची टीम; भिडे-बबिता-माधवीचा अंदाज पाहून चाहतेही खुश

TMKOC: न्यूयॉर्कमधील हा दौरा 'तारक मेहता'च्या कलाकारांसाठी केवळ परदेशवारी नसून भारतीय संस्कृती आणि मनोरंजनाची जागतिक पातळीवर झलक दाखवणारा खास अनुभव ठरला आहे.

TMKOC: न्यूयॉर्कच्या गगनचुंबी इमारतीवर ‘तारक मेहता’ची टीम; भिडे-बबिता-माधवीचा अंदाज पाहून चाहतेही खुश
तारक मेहता का उल्टा चष्माImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 03, 2026 | 11:22 AM
Share

TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. भारतासोबतच परदेशातही या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. आता मालिकेतील काही कलाकार न्यूयॉर्कमध्ये पोहोचले असून, त्यांनी प्रसिद्ध एम्पायर स्टेट बिल्डिंगवरून चाहत्यांना खास झलक दाखवली आहे. मंदार चंदवडकर, मुनमुन दत्ता आणि सोनालिका जोशी यांच्या फोटो आणि व्हिडीओंनी सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेतील भारतीय समुदायासोबत खास सेलिब्रेशन केलं. फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सच्या (FIA) 44व्या इंडिया डे परेडमध्ये मालिकेच्या टीमने सहभाग घेतला. न्यूयॉर्कमधील मॅडिसन अव्हेन्यूवर झालेल्या या भव्य परेडमध्ये कलाकारांनी चाहत्यांचं अभिवादन स्वीकारलं.

या टीममध्ये दिलीप जोशी, मंदार चंदवडकर, मुनमुन दत्ता, सोनालिका जोशी, बलविंदर सिंग सुरी आणि नितीश भलुनी यांच्यासह निर्माते असित कुमार मोदी सहभागी झाले होते. परेडदरम्यान कलाकारांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय प्रेक्षक उपस्थित होते. हातात तिरंगा घेऊन चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या कलाकारांचं उत्साहात स्वागत केलं.

यानंतर मालिकेतील कलाकारांनी न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध एम्पायर स्टेट बिल्डिंगलाही भेट दिली. सोनालिका जोशी यांनी या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘माधवी भिडे’च्या भूमिकेत लोकप्रिय असलेल्या सोनालिका या फोटोंमध्ये सुंदर जांभळ्या रंगाच्या साडीत दिसत आहेत. पारंपरिक दागिने, बिंदी आणि केसांची आकर्षक स्टाइल असा त्यांचा लूक चाहत्यांना विशेष आवडला.

मंदार चंदवडकर यांनीही न्यूयॉर्कमधील उंचीचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. मालिकेत ते आत्माराम तुकाराम भिडेची भूमिका साकारतात, तर मुनमुन दत्ता ‘बबिता अय्यर’च्या भूमिकेमुळे प्रसिद्ध आहेत. या तिघांचे न्यूयॉर्कमधील फोटो पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मागे न्यूयॉर्कचं विहंगम दृश्य दिसत आहे. ही तीच इमारत आहे, जिथे ‘किंग काँग’ या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं, असं त्यांनी पुढे सांगितलं. फार कमी लोकांना तिथे प्रवेश करण्याची संधी मिळते. मुनमुन दत्ताने व्हिडीओ शेअर करत लिहिलं, ‘जेव्हा तुम्हाला उंचीची भीती वाटते.’

विशेष म्हणजे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने यंदा 18 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. 28 जुलै 2008 रोजी सुरू झालेल्या या मालिकेने दीर्घकाळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आजही मालिकेतील अनेक कलाकार आपल्या पात्रांमुळे घराघरात ओळखले जातात.

Follow Us
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या निकालावर पवारांचं मौन! सुनावणी संपलेली नाही...
Sharad Pawar | शिवसेना पक्ष-चिन्हाच्या निकालावर पवारांचं मौन! सुनावणी संपलेली नाही, त्याआधी...
ठाकरे सेनेला मुंबईत धक्का! विशाखा राऊतांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार
Vishakha Raut | ठाकरे सेनेला मुंबईत मोठा धक्का! विशाखा राऊतांची याचिका हायकोर्टाने फेटाळली; थेट नगरसेवकपदावरच टांगती तलवार
शिल्पा गवारे यांच्या शोकसभेत उपमहापौर हसल्या; VIDEO होतोय व्हायरल
एका बाजूला शिल्पा गवारे यांना श्रद्धांजली, दुसरीकडे उपमहापौर हसताना दिसल्या; VIDEO होतोय व्हायरल
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस! सरकारच्या शिष्टमंडळाची आज पुन्हा भेट, चर्चेकडे महाराष्ट्राचं लक्ष
मसाज सेंटरच्या नावाखाली काय सुरू होतं?; पोलिसांनी टाकला छापा
Nanded | मसाज सेंटरच्या नावाखाली काय सुरू होतं?; डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी टाकला छापा, 7 महिलांची सुटका
माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या
Supriya Sule on Ajit Pawar Accident | माझा भाऊ गेला, आता सत्ता हे लोक उपभोगत आहेत! सुप्रिया सुळे संतापल्या; अजित पवारांच्या अपघातावरून घणाघात
जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद
Maratha Reservation | जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाजाचा एल्गार! परळी बंद, हिंगोली-नांदेडमध्ये रास्ता रोको
मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित
Mumbai RSS BJP | मुंबईत RSS-BJPची मोठी समन्वय बैठक! फडणवीसांसह मंत्री उपस्थित; राजकीय-सामाजिक मुद्द्यांवर मंथन
धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी
Gopichand Padalkar | धनगर समाजाचा 7 सप्टेंबरला राज्यव्यापी एल्गार! ST आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन