Tamannaah Bhatia | ‘या’ एका व्यक्तीसाठी तमन्ना भाटियाने मोडला 18 वर्षांपासूनचा ‘नो किसिंग’ नियम

गेल्या काही दिवसांपासून तमन्ना आणि विजय वर्मा यांच्या डेटिंगच्या चर्चा जोरदार होत्या. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तमन्ना विजयसोबतच्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती.

Tamannaah Bhatia | 'या' एका व्यक्तीसाठी तमन्ना भाटियाने मोडला 18 वर्षांपासूनचा 'नो किसिंग' नियम
Tamannaah BhatiaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 15, 2023 | 10:50 AM

मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिच्या आतापर्यंतच्या 18 वर्षांच्या करिअरमध्ये चित्रपटात एकदाही किसिंग सीन दिला नव्हता. सहअभिनेत्यासोबत किसिंग सीन न करण्याचा तिचा नियमच होता. मात्र आता ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटासाठी तिने हा 18 वर्षांचा नियम अखेर मोडला आहे. सहअभिनेता आणि बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत तिचे या चित्रपटात बरेच इंटिमेट सीन्स आहेत. विजयसाठी तिने ‘नो किसिंग पॉलिसी’ला अखेर रामराम केला का, या प्रश्नाचं उत्तर तमन्नाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलं आहे.

बॉयफ्रेंड विजयसाठी मोडला 18 वर्षांचा नियम

‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथॉलॉजी चित्रपटात काम करण्याविषयी तमन्ना म्हणाली, “मला सुजॉय घोष यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा होती. करिअरमध्ये आतापर्यंत कधीच इंटिमेट सीन न करताही दिग्दर्शकांनी मला या भूमिकेसाठी निवडलं, याचं मला फार कौतुक वाटतंय. मोठ्या पडद्यावर मला रोमान्स करताना पाहून प्रेक्षकांना संकोचल्यासारखं वाटेल असं माझं मत होतं. त्यामुळे मी स्क्रीनवर कधीच किसिंग सीन न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय प्रेक्षक हे गेल्या काही वर्षांत बरेच सुजाण झाले आहेत. बोटाच्या एका क्लिकवर त्यांना सगळी माहिती उपलब्ध असते. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून मला साचेबद्ध काम करायचं नव्हतं.”

हे सुद्धा वाचा

“प्रसिद्धीसाठी इंटिमेट सीन केला नाही”

असं असलं तरी केवळ प्रसिद्धीसाठी ‘नो किसिंग पॉलिसी’ तोडलं नसल्याचं तमन्नाने स्पष्ट केलं. “गेल्या 18 वर्षांत मी बऱ्याच ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते चित्रपट हिट होण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी मला कधीच इंटिमेट सीन किंवा किसिंग सीन करावे लागले नाही. लस्ट स्टोरीज 2 मध्ये फक्त कथेची गरज म्हणून मी तो सीन केला.”

पहा टीझर-

तमन्नाने दिली प्रेमाची जाहीर कबुली

गेल्या काही दिवसांपासून तमन्ना आणि विजय वर्मा यांच्या डेटिंगच्या चर्चा जोरदार होत्या. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तमन्ना विजयसोबतच्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. तमन्नाने या मुलाखतीत विजय वर्माबद्दलचं प्रेम जाहीरपणे व्यक्त केलं होतं. हे दोघं लवकरच ‘लस्ट स्टोरीज 2’ या अँथॉलॉजी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. दोघांचा एकत्र हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. त्याआधी नवीन वर्षाच्या सुरुवातीला तमन्ना आणि विजयला गोव्यातील एका पार्टीदरम्यान एकमेकांना किस करताना पाहिलं गेलं होतं. किसिंगचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.