AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raveena Tandon: रवीनालाही करावा लागला होता ‘या’ गोष्टीचा सामना; सर्वसामान्य मुलीसारखाचा तिलाही चुकला नाही संघर्ष

रवीनाने लिहिले की, "लहान असताना मीही कधीतरी लोकल ट्रेन आणि बसनेही प्रवास केला आहे. अनेक वेळा माझा विनयभंगही झाला आहे,अनेकदा मला चिमटा काढण्यात आला आहे, माझ्यासोबतही असे सर्व काही घडले आहे.

Raveena Tandon: रवीनालाही करावा लागला होता 'या' गोष्टीचा सामना; सर्वसामान्य मुलीसारखाचा तिलाही चुकला नाही संघर्ष
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jul 04, 2022 | 12:38 AM
Share

मुंबईः अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) अलीकडेच एक खुलासा केला आहे की किशोरवयीन वयात असताना मुंबईच्या लोकल बसमधून जात असताना तिचा विनयभंग झाला होता. सोशल मीडियावर ट्रोल (Trolls) करणाऱ्याना उत्तर देताना रवीनाने सांगितले की, इतकेच नाही तर रवीनासुद्धा आपणही एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय मुलीप्रमाणेच संघर्ष केला आहे आणि माझं शारीरिक शोषणही (Physical abuse) झालं आहे. रवीना टंडन यांनी आता महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या मेट्रो 3 कारशेडचे आरे परिसरात स्थलांतर करण्याच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले.

रवीना ते दिया मिर्झा यांसारखे सेलिब्रिटीनी आरे परिसरातील जंगल तोडून तेथे आरे मेट्रो ३ कारशेड बांधण्याचला विरोध दर्शविला आहे. मुंबई लोकल बसमध्येही माझा विनयभंग झाला होता असं सांगितले.

अनेक वेळा माझाही विनयभंग झाला

या प्रकरणावर एका यूजरने रवीना आणि दियासह अनेक सेलिब्रिटींना टॅग केले आणि लिहिले की त्यांना मुंबईतील मध्यमवर्गीय लोकांच्या संघर्षाबद्दल काही माहिती आहे की नाही. याला उत्तर देताना रवीनाने लिहिले की, “लहान असताना मीही कधीतरी लोकल ट्रेन आणि बसनेही प्रवास केला आहे. अनेक वेळा माझा विनयभंगही झाला आहे,अनेकदा मला चिमटा काढण्यात आला आहे, माझ्यासोबतही असे सर्व काही घडले आहे. अशा अनेक मुलींना जो त्रास होतो, त्याच जाचातून मला जावं लागलं आहे.

शहरात होणाऱ्या विकासाचे स्वागतच

मी खरेदी केली आहे. करीना सांगते की, मी 1992 साली माझी पहिली कार खरेदी केली. शहरात होणाऱ्या विकासाचे स्वागतच आहे. पण, केवळ एका प्रकल्पासाठी आपण जबाबदार नाही, तर आपण पर्यावरण आणि वन्यजीव, तोडल्या जाणार्‍या जंगलांचे आपण संरक्षण केले पाहिजे आणि या सगळ्यासाठी आपण जबाबदारीनेही वागले पाहिजे असंही तिने सांगितले आहे.

ट्रोलर्सकडून शारीरिक शोषण

लोकल ट्रेनचा व्हिडीओ शेअर करताना दुसऱ्या युजरने रवीनाला टॅग करून विचारले आहे की, तू असा प्रवास शेवटचा कधी केला होता? यावर रवीनाने उत्तर दिले की, 1991 पर्यंत मी ट्रेन आणि बसमधून सर्वसामान्यांप्रमाणेच मी प्रवास केला आहे आणि एक मुलगी म्हणून मला तुमच्यासारख्या अज्ञात ट्रोलर्सकडून शारीरिक शोषणाचा सामना करावा लागला आहे.

 तुमच्याकडेही कार आणि घर असेल

याशिवाय दुसर्‍या ट्रोलरला उत्तर देताना रवीनाने लिहिले की, “प्रत्येकाचे आयुष्य गुलाबाच्या बिछान्यासारखे गुलाबीच असते असे नसते. प्रत्येकाचा स्वतःचा एक संघर्ष असतो. मला मनापासून आशा आहे की तुमच्याकडेही कार आणि घर असेल.कधी तरी पूर, नैसर्गिक आपत्ती काहीही आलं तरी त्यामध्ये सगळ्यात आधी सामान्य माणसावर त्याचा परिणाम होईल आणि श्रीमंत लोक सर्व काही सोडून पळून जातील असंही तिने म्हटले आहे.

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,