AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती विसर्जन पहायला आवडत नाही, त्रास होतो..; मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने गणपती विसर्जनाबाबत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. गणपती विसर्जन पाहायला आवडत नसल्याचं तिने म्हटलंय. यामागचं कारणसुद्धा तिने सांगितलं आहे. ही अभिनेत्री सध्या झी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

गणपती विसर्जन पहायला आवडत नाही, त्रास होतो..; मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना
गणपती विसर्जनाबाबत अभिनेत्रीकडून भावना व्यक्तImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 07, 2025 | 9:47 AM
Share

आतापर्यंत ‘तारिणी’ने हुशारी आणि धाडसीपणाने अनेक अंडरकव्हर ऑपरेशन्स यशस्वी पणे पार पाडले आहेत. तारिणीची पूर्ण टीम हे सीन्स शूट करताना अनेक अवघड प्रकरणांना सामोरी जाते. या गणेशोत्सवात तारिणीला एक नवी आणि अतिशय महत्वाची केस मिळाली आहे, ती म्हणजे न्यायमूर्ती चारुदत्त देसाई यांची. चारुदत्त देसाई हे न्यायप्रिय, निर्भिड आणि नियमांच्या बाबतीत अत्यंत कडक असे मान्यवर न्यायमूर्ती आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे पण त्यांनी पोलिस संरक्षण नाकारलं कारण त्यांना वाटतं की, अशा धमक्या त्यांच्या कारकिर्दीत नवीन नाहीत. पण पोलीस विभाग चिंतेत आहे, कारण गणपतीत त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर लोक दर्शनासाठी येतात आणि त्यामुळे धोका अधिक वाढू शकतो. म्हणून ही जबाबदारी तारिणीवर सोपवली जाते.

तारिणीच्या टीममधले काही जण चारुदत्त देसाईच्या घरी गुप्तरीत्या प्रवेश करून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडणार आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी तारिणीला एक महत्त्वाची टीप मिळते की विसर्जन मिरवणुकीदरम्यानच न्यायमूर्ती चारुदत्त देसाई यांची हत्या होणार आहे. एकीकडे उत्सवात सामान्य माणसांना दुखापत न होण्याची काळजी घेणं आणि दुसरीकडे एका महत्वाच्या व्यक्तीचा जीव वाचवण्याची धडपड हे सर्व पाहणं प्रेक्षकांसाठीही थरारक ठरणार आहे. तारिणीची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री शिवानी सोनार हिने या विशेष एपिसोडसाठी गायमुख मुंबई, इथं प्रत्यक्ष गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शूटिंग केलं.

याविषयी बोलताना शिवानी म्हणाली , “रिअल लोकेशनवर शूट करणं खूपच आव्हानात्मक होतं. गर्दीत शूट करताना वेळेचं आणि सुरक्षेचं भान ठेवणं गरजेचं होतं. हा सीन शूट करणं अवघड होतं. पण आमची संपूर्ण टीम आणि दिग्दर्शक भीमराव मुडे सर यांची टीमसोबत केलेली प्लॅनिंग खूप कमाल होती. प्रेक्षकांनी चित्रपटांमध्ये पाहिले असतील असे अॅक्शन सीन टीव्हीवर अनुभवायला मिळणार आहे.”

“शिवानी म्हणून मला गणपती विसर्जन पाहायला आवडत नाही, कारण मला त्रास होतो, रडू येतं. पण हे विसर्जन शूट करताना खूप मजा आली. एक सकारात्मक गोष्ट ही की प्रेक्षक तारिणीला ओळखत होते, भेटत होते, तारिणी म्हणून हाक मारत होते. त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आमचं काम पाहून मिळणारी दाद हे सर्व खूप खास होतं”, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते उमेश जगताप न्यायमूर्ती चारुदत्त देसाई यांच्या भूमिकेत दिसणार आहेत

हा गणेशोत्सव स्पेशल एपिसोड प्रेक्षकांसाठी एक भावनिक, थरारक आणि प्रेरणादायी अनुभव घेऊन येणार आहेत. एकीकडे भक्ती आणि दुसरीकडे कर्तव्य यांचा संगम कसा साधला जातो, हे ‘तारिणी’च्या माध्यमातून प्रेक्षकांना पहायला मिळेल. ‘तारिणी’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.