Video: तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अजिंक्य देवसोबत रोमॅन्स, नव्या व्हिडीओने वेधले लक्षले

Video: अभिनेत्री तेजश्री प्रधानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तेजश्री प्रधान 61 वर्षीय अजिंक्य देवसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे.

Video: तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अजिंक्य देवसोबत रोमॅन्स, नव्या व्हिडीओने वेधले लक्षले
Tejashree Pradhan
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 25, 2025 | 2:11 PM

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान ओळखली जाते. ती तिच्या खासगी आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तेजश्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती अभिनेता अजिंक्य देवसोबत रोमॅन्स करताना दिसत आहे. या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ एका चित्रपटाचा ट्रेलर आहे. तेजश्री आणि अजिंक्य देव कोणत्या चित्रपटात एकत्र दिसणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

काय आहे चित्रपटाचा ट्रेलर?

तेजश्री आणि अजिंक्य देव ‘आसा मी अशी मी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात एक अनोखी प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे. या ट्रेलर मध्ये आपण पाहू शकतो अभिनेते अजिंक्य रमेश देव एक भारतीय फोटोग्राफरच्या भूमिकेत आहेत. देखणा, स्टायलिश आणि थोडासा कॅसानोव्हा स्वभावाचा. त्यांचं व्यक्तिमत्त्व एकदम मोकळं, धडाडीचं आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेणारं दाखवलं आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री तेजश्री प्रधान एक परिपक्व, स्थिर आणि स्वतःच्या स्वप्नांनी भरलेली मुलगी म्हणून दिसते जी लंडनमध्ये स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी चालवते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. ट्रेलर मध्ये हि प्रेमकहाणी जिथे सुंदर उंची गाठते, तिथेच एक अनपेक्षित वळण दिसतं. तेजश्री अचानक अजिंक्यपासून दूर जाताना दिसते. या निर्णयामागचं कारण काय? हे रहस्यच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरतं.

चित्रीकरण झाले लंडनमध्ये

आसा मी अशी मी’ या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये झाले आहे. त्यामुळे चित्रपटातील प्रत्येक फ्रेम अधिकच उठून दिसते. मराठी सिनेमात पहिल्यांदाच इतक्या ग्रँड स्केलवर चित्रिकरण झाले असून, रोल्स रॉयसची लक्झरी, प्रसिद्ध हेरिटेज लोकेशन असलेला हार्टलेबरी कॅसलचे राजेशाही वैभव आणि इतर अप्रतिम लोकेशन्समुळे प्रत्येक फ्रेमला भन्नाट भव्यता लाभली आहे.

कधी प्रदर्शित होणार?

आसा मी अशी मी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल शेटगे यांनी केले आहे. या चित्रपटात अजिंक्य रमेश देव आणि तेजश्री प्रधान यांच्यासोबत अनेक भारतीय आणि ब्रिटिश कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. मुख्य कलाकारांसोबतच माधव देवचके, संजय मोने, कृष्णकांत जगन्नाथ केणी आणि यशश्री मसुरकर यांसारखे दमदार आणि अनुभवी मराठी कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या 28 नोव्हेंबर 2025 ला प्रदर्शित होणार आहे.

Follow Us