First Salary: तेजस्वी प्रकाश, श्वेता तिवारी, रुपाली गांगुली यांचा पहिला पगार माहितीये का? आता आहेत कोट्यवधींच्या मालकीण

सध्या या अभिनेत्री टेलिव्हिजनच्या 'क्वीन' आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पण या अभिनेत्रींना त्यांचा पहिला पगार किती मिळाला असेल, हे तुम्हाला माहित आहे का?

First Salary: तेजस्वी प्रकाश, श्वेता तिवारी, रुपाली गांगुली यांचा पहिला पगार माहितीये का? आता आहेत कोट्यवधींच्या मालकीण
TV actressImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 6:00 PM

कलाविश्वात असे काही टेलिव्हिजन कलाकार आहेत, ज्यांची लोकप्रियता ही बॉलिवूड सेलिब्रिटींइतकीच आहे. छोट्या पडद्यावर जरी करिअरची सुरुवात केली असली तरी या कलाकारांचा स्टारडम मात्र मोठा आहे. तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash), श्वेता तिवारी (Shweta Tiwari), रुपाली गांगुली (Rupali Ganguly), शहनाज गिल या अभिनेत्रींचा त्यात समावेश होतो. सध्या या अभिनेत्री टेलिव्हिजनच्या ‘क्वीन’ आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पण या अभिनेत्रींना त्यांचा पहिला पगार किती मिळाला असेल, हे तुम्हाला माहित आहे का? ‘बिग बॉस’, ‘अनुपमा’, ‘नागिन’ यांसारख्या आताच्या मालिकांसाठी जरी या अभिनेत्रींना तगडं मानधन मिळालं असलं तरी त्यांना करिअरच्या सुरुवातीला त्यांना किती मानधन मिळालं ते जाणून घेऊयात.

‘बॉलिवूड लाइफ डॉटकॉम’ने दिलेल्या वृत्तानुसार तेजस्वी प्रकाशला एका एपिसोडसाठी 25 हजार रुपये मानधन मिळायचं. ही जवळपास दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता तेजस्वी ‘नागिन 6’च्या एका एपिसोडसाठी तब्बल दोन लाख रुपये मानधन घेते. तेजस्वीला बिग बॉस या शोमधूनही प्रचंड लोकप्रियता मिळाली. अभिनेता करण कुंद्राला ती डेट करत असून बिग बॉसच्या घरात असतानाच दोघांच्या रिलेशनशिपची सुरुवात झाली. या जोडीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे.

हे सुद्धा वाचा

तेजस्वी प्रकाश-

View this post on Instagram

A post shared by Karan Kundrra (@kkundrra)

‘बिग बॉस 13’मधून लोकप्रिय झालेली गायिका आणि अभिनेत्री शहनाज गिल हिला 2016 मध्ये तिच्या पहिल्या म्युझिक व्हिडीओसाठी जवळपास 70 हजार रुपये मानधन मिळालं होतं. आता ती एका जाहिरातीसाठी जवळपास 25 लाख रुपये मानधन घेते. शहनाजची एकूण संपत्ती ही 30 कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातं. ती लवकरच सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

शहनाज गिल-

‘अनुपमा’ या मालिकेमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री रुपाली गांगुली अत्यंत लोकप्रिय आहे. रुपालीने याआधीही बऱ्याच मालिकांमध्ये काम केलंय. मात्र ‘अनुपमा’ ही तिची आताची मालिका टीआरपीच्या यादीत नेहमीच पहिल्या क्रमांकावर असते. रुपालीला पहिला पगार म्हणून 15 हजार रुपये मिळाले होते आणि आता ती छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘अनुपमा’ या सुपरहिट मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती तीन लाख रुपये मानधन घेते.

रुपाली गांगुली-

View this post on Instagram

A post shared by Rups (@rupaliganguly)

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारून अभिनेत्री श्वेता तिवारी प्रचंड लोकप्रिय झाली. याच मालिकेसाठी तिला एकता कपूरने पाच लाख रुपयांचं पहिलं चेक दिलं होतं. आता श्वेता मालिकेच्या एका एपिसोडसाठी जवळपास तीन लाख रुपये मानधन घेते. श्वेताची वार्षिक कमाई ही दहा कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातं. श्वेताची मुलगी पलकसुद्धा कलाविश्वात काम करते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.