Love Story | ब्रेकअपमुळे दुःखी झालेल्या दिव्यांकासाठी आधार बनला विवेक दहिया, साधेपणाच्या प्रेमात पडली अभिनेत्री!

अभिनेता शरद मल्होत्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिव्यांका त्रिपाठी मनाने खूप खचली होती. ती खूप कठीण काळातून जात होती. त्यानंतर तिची भेट विवेक दहियाशी झाली. विवेक आणि दिव्यांका आधी मित्र बनले आणि नंतर दोघांनी ‘ये है मोहब्बतें’ शोमध्ये एकत्र काम केले. त्यावेळी त्यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या, पण त्या दोघांनीही यावर नेहमी मौन बाळगलं.

Love Story | ब्रेकअपमुळे दुःखी झालेल्या दिव्यांकासाठी आधार बनला विवेक दहिया, साधेपणाच्या प्रेमात पडली अभिनेत्री!
दिव्यांका-विवेक

मुंबई : टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) जितकी तिच्या अभिनय आणि मालिकांमुळे चर्चेत असते, तितकीच ती तिच्या वैयक्तिक जीवनही चर्चेत असते. दिव्यांका कारकीर्दीच्या सुरुवातीस एका अभिनेत्यावर प्रेम करत होती. दोघे बरीच वर्षे एकत्र राहिले, पण नंतर त्यांचे नाते तुटले. यामुळे दिव्यांका खूप खचली होती. पण काही काळानंतर अभिनेता विवेक दहिया (Vivek Dahiya) तिच्या आयुष्यात आला. आधीच खचलेल्या दिव्यांकाला असं वाटत नव्हतं की, ती पुन्हा कोणावरही प्रेम करू शकेल. परंतु, विवेकच्या साधेपणावर दिव्यांका भाळली होती (A cute love story of Actress Divyanka Tripathi and Actor Vivek Dahiya).

अभिनेता शरद मल्होत्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिव्यांका त्रिपाठी मनाने खूप खचली होती. ती खूप कठीण काळातून जात होती. त्यानंतर तिची भेट विवेक दहियाशी झाली. विवेक आणि दिव्यांका आधी मित्र बनले आणि नंतर दोघांनी ‘ये है मोहब्बतें’ शोमध्ये एकत्र काम केले. त्यावेळी त्यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या, पण त्या दोघांनीही यावर नेहमी मौन बाळगलं.

दिव्यांका म्हणाली होती की, ‘आम्ही दोघे प्रेमात किंवा डेटिंगमध्ये आपला वेळ वाया घालवू इच्छित नव्हतो. आम्हाला लगेच लग्न करायचं होतं.’ दिव्यांकाने म्हटलं होतं की, आम्ही दोघं पार्टी करत नाही, मद्यपान करत नाही, धूम्रपान करत नाही, त्यामुळे आमचे नाते आणखी मजबूत झाले आहे.

कशी झाली प्रेमाची सुरुवात?

विवेकने एका मुलाखतीत म्हटले असे होते की, ‘आमच्या पहिल्या भेटीत प्रेमासारखे काही नव्हते. आमची ओळख एका कॉमन मैत्रिणीमुळे झाली. मग, आम्ही एकमेकांकडे लाईफ पार्टनर म्हणून पाहू लागलो. आम्ही कामानंतर भेटायचो आणि एकमेकांना समजून घ्यायचो.’ तर दिव्यांका म्हणाली की, ‘मला विवेकचा साधेपणा आवडला. तो नेहमीच माझी काळजी घेतो आणि मी त्याच्याबरोबर खूप समाधानी आहे.’ दिव्यांका तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य खूप चांगल्या प्रकारे हाताळते.

लग्नासाठी प्रपोज

2015मध्ये विवेकने अखेर निर्णय घेतला की, आपण दिव्यांकाला प्रपोज करू. त्याने दिव्यांकाच्या वाढदिवशी तिला प्रपोज करण्याची योजना तयार केली. दोघे बंगळुरूमध्ये दिव्यांकाच्या पालकांना भेटायला गेले होते. विवेक प्रथमच दिव्यांकाच्या पालकांना भेटणार होता आणि त्या दरम्यान त्याने अभिनेत्रीच्या पालकांसमोर तिला लग्नासाठी विचारले. दिव्यांकाने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘मी केक कापणार होते, तेव्हा विवेक समोर क्युट टी-शर्ट घालून उभा राहिला होता आणि त्यावर लिहिले होते की,’दिव्यांका माझ्याशी लग्न करशील का?’ दोघांच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांना आश्चर्याच्या धक्का बसला होता.

आनंदी विवाहित जीवनाचे रहस्य

दोघांनी भोपाळमध्ये लग्न केले आणि चंदीगडमध्ये रॉयल रिसेप्शन दिले. दोघेही टीव्हीच्या लोकप्रिय आणि क्युट जोडप्यांपैकी एक आहेत. प्रत्येकजण या जोडीचे खूप कौतुक करतो. दोघांबद्दलची खास गोष्ट म्हणजे ती दोघेही केवळ वैयक्तिकच नव्हे तर व्यावसायिकदृष्ट्या देखील एकमेकांना पूर्णपणे साथ देतात. जर, तुमचा जोडीदार तुम्हाला समजून असेल आणि नेहमीच तुमच्या पाठीशी उभा असेल, तर यापेक्षा आणखी काय हवं? हेच आमच्या सुखी जीवनाचं रहस्य आहे.

(A cute love story of Actress Divyanka Tripathi and Actor Vivek Dahiya)

हेही वाचा :

अभिनव शुक्लासोबत ‘वन नाईट स्टँड’चा आरोप, अभिनेत्री सोफिया हयात म्हणते…

लेक वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माने केला नवा हेअरकट, सोनम कपूरने केली मोठी मदत!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI