Aai Kuthe Kay Karte | अपेक्षित होता आशुतोष अन् समोर आली अरुंधती, ‘रुमाल पाणी’ खेळात रंगला कलगीतुरा!

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay karte ) या मालिकेत सध्या लागाची धामधूम सुरु आहे. या सोहळ्यात देशमुखांचं संपूर्ण कुटुंब धमाल करताना दिसत आहे. या सोहळ्या आधी देशमुखांच्या घरात काही खेळ आयोजित करण्यात आले होते. नेहमीसारखं संगीत खुर्ची, दमशेराज खेळणं टाळत यावेळी त्यांनी ‘रुमाल पाणी’ हा खेळ निवडला. या खेळात ‘आई कांचन’ विरुद्ध ‘अप्पा’ अशा टीम देखिल तयार झाल्या आहेत.

Aai Kuthe Kay Karte | अपेक्षित होता आशुतोष अन् समोर आली अरुंधती, ‘रुमाल पाणी’ खेळात रंगला कलगीतुरा!
Aai Kuthe Kay Karte (Credit Hotstar)
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 12:39 PM

मुंबई : ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay karte ) या मालिकेत सध्या लागाची धामधूम सुरु आहे. या सोहळ्यात देशमुखांचं संपूर्ण कुटुंब धमाल करताना दिसत आहे. या सोहळ्या आधी देशमुखांच्या घरात काही खेळ आयोजित करण्यात आले होते. नेहमीसारखं संगीत खुर्ची, दमशेराज खेळणं टाळत यावेळी त्यांनी ‘रुमाल पाणी’ हा खेळ निवडला. या खेळात ‘आई कांचन’ विरुद्ध ‘अप्पा’ अशा टीम देखिल तयार झाल्या आहेत.

आता या खेळात दोन्ही टीममधून एक-एक खेळाडू असा सामना रंगणार आहे. यात आता ‘आई कांचन’ टीममधून संजना तर अप्पांच्या टीममधून अरुंधती यांचा आमना सामना होणार आहे. यावेळी संजनाला मात्र आपल्यासोबत आशुतोषचं नाव यावं असं वाटत होतं. मात्र, समोर अरुंधती आल्याने तिचा हिरमोड झाल आहे.

काय डोकी आपटायची ती इथे आपटा!

आपल्या समोर अरुंधतीचं नाव आल्यावर वैतागलेली संजना अनिरुद्धला जाऊन म्हणते की, माझ्यासोबत आशुतोषचं नाव आलं असतं, तर मजा आली असती ना.. यावर अनिरुद्ध म्हणतो की, म्हणजे मी आणि अरुंधती.. तर, संजना म्हणते, हो चाललं असतं, काय डोकी आपटायची ती इथे आपटा! आम्हाला सवय आहे, आम्ही बघितलं असतं.

काय धरून ठेवायचं आणि काय सोडायचं मला चांगलं कळतं!

‘रुमाल पाणी’ खेळत समोरासमोर आल्यावर संजना अरुंधतीला म्हणते की, ‘तुला सगळंचं सोडून द्यायची सवय आहे ना.. मग हा खेळ पण सोडून दे..’ यावर अरुंधती म्हणते, ‘काय धरून ठेवायचं आणि काय सोडायचं मला चांगलं कळतं!’. यानंतर संजना म्हणते, ‘शेवटी तुझी गाठ माझ्याशीच आहे…’ यावर अरुंधती तिला म्हणते, ‘बिचारी, म्हणून तू कधीच खरी जिंकत नाहीस..’ संजना लक्ष विचलित करण्यासाठी म्हणते की, ‘मला जे हवं ते नेहमी मिळतं, माहितेय ना तुला…आणि मी नेहमी तगडी स्पर्धा देते.’ यावर उत्तर देताना अरुंधती म्हणते की, ‘मुळात स्पर्धा करायला आपण एक क्षेत्रात नाही आहोत.’ यानंतर दोघींमध्ये चांगलाच शाब्दिक कलगी-तुरा रंगला होता. या दृश्यात चांगली चुरस पाहायला मिळाली.

मालिकेच्या सध्या सुरु असलेल्या ट्रॅकमध्ये बऱ्याचदा 90’च्या रोमान्स फिल्मच्या आयडिया डोकावताना दिसतात. इतकच नाही तर, मालिकेच्या पार्श्वभूमीलादेखील अशीच काही गाणी देखील ऐकू येतात. काही दृश्यानंमध्ये या गोष्टी ठीक वाटतील, मात्र सतत जर याची पुनरावृत्ती झाली तर प्रेक्षक कंटाळणार नाहीत याची काळजी देखील लेखक आणि निर्मात्यांना घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Raju Srivastav | अभिनयाच्या वेडापायी मुंबईत आला, आर्थिक तंगीत रिक्षा चालवली अन् एका प्रवाशामुळे बदललं राजू श्रीवास्तवचं नशीब!

Happy Birthday Nagma | सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण, तुम्हाला माहितेय का अभिनेत्री नगमाचे खरे नाव?

Atrangi Re Twitter Review : सारा आणि धनुषच्या लव्हस्टोरीने जिंकली प्रेक्षकांची मनं, पाहा नेटकरी काय म्हणाले…

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.