AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atrangi Re Twitter Review : सारा आणि धनुषच्या लव्हस्टोरीने जिंकली प्रेक्षकांची मनं, पाहा नेटकरी काय म्हणाले…

बॉलिवूड स्टार सारा अली खान (Sara Ali Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुष (Dhanush) यांचा चित्रपट 'अतरंगी रे' (Atrangi Re) OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात साराने रिंकूची भूमिका साकारली आहे, तर धनुष विशूची भूमिका साकारत आहे.

Atrangi Re Twitter Review : सारा आणि धनुषच्या लव्हस्टोरीने जिंकली प्रेक्षकांची मनं, पाहा नेटकरी काय म्हणाले...
Atrangi Re
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 4:55 PM
Share

मुंबई : बॉलिवूड स्टार सारा अली खान (Sara Ali Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुष (Dhanush) यांचा चित्रपट ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात साराने रिंकूची भूमिका साकारली आहे, तर धनुष विशूची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा, धनुष आणि अक्षय त्यांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ट्विटर युजर्सनी ‘अतरंगी रे’चा रिव्ह्यू दिला आहे.

सुरुवातीच्या ट्विटर रिव्ह्यूवरून असे दिसते की, सारा आणि धनुषची केमिस्ट्री, अक्षयच्या अनोख्या कॅमिओने प्रेक्षक प्रभावित झाले आहेत. एआर रहमानच्या संगीताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ट्विटर वापरकर्त्यांनुसार चित्रपटाची कथा तसेच ए. ए आर रहमानच्या गाण्यांनी मन जिंकले आहे. काहींनी साराच्या ‘चका चक’ गाण्याला आमच्या प्लेलिस्टमध्ये पहिली जागा असेल, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, धनुषने या चित्रपटात खूप चांगला अभिनय केला आहे. काही युजर्सनी लिहिले आहे की, हा खूप चांगला चित्रपट आहे, तुम्ही तो जरूर पहा.

पाहा नेटकरी काय म्हणाले…

ट्विटर युजर्सना चित्रपट आवडत आहेत. बऱ्याच दिवसांनी हा चित्रपट अखेर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाला ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे.’चका चक’, ‘रैत जरा सी’, ‘गर्दा’ या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि राय यांनी संयुक्तपणे केली आहे.

हेही वाचा :

हवाई सफारीमध्ये हरवून जा भारतीय संगितात, विमानतळावरही ऐकू येईल अभिजात भारतीय संगीत!

शिवराज अष्टकातील तिसरं पान उलगडणार बाजीप्रभूंचा इतिहास! ‘पावनखिंड’ मध्ये पुन्हा चिन्मय शिवरायरूपात!

Today Release Films | शुक्रवार ठरणार मनोरंजनाचा वार! रणवीरच्या ‘83’पासून ते साराच्या ‘अतरंगी रे’पर्यंत अनेक चित्रपट-सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला!

Happy Birthday Anil Kapoor | एकेकाळी गॅरेजमध्ये राहून काढले दिवस, आता जगाच्या कानाकोपऱ्यातील आलिशान बंगल्यांचा मालक अनिल कपूर!  

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.