Aai Kuthe Kay karte | देशमुखांनंतर आता संजनाचा मोर्चा अनघाकडे, अभि-अनघाच्या तुटलेल्या लग्नाला ठरवणार अरुंधतीला जबाबदार!

यावेळी घरी आलेल्या अनघाला पाहून संजना आता आपला मोर्चा तिच्याकडे वळवणार आहे. घरातील कृष्णजन्म सोहळा आणि पूजा पार पडल्यानंतर संजना अनघाकडे येऊन तिला घरी आल्याबद्दल थँक्यू म्हणते. तर, इतकं सगळं होऊनही तू अभिकडे येतेस, तुला कसं जमलं?, असं विचारते.

Aai Kuthe Kay karte | देशमुखांनंतर आता संजनाचा मोर्चा अनघाकडे, अभि-अनघाच्या तुटलेल्या लग्नाला ठरवणार अरुंधतीला जबाबदार!
आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 1:59 PM

मुंबई : संजना दीक्षित आता देशमुखांच्या घरात येऊन संजना अनिरुद्ध देशमुख बनली आहे. तर, दुसरीकडे अति मुक्त विचारांच्या संजनाला अवघ्या दोनच दिवसांत आता देशमुखांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे विचार पटेनासे झाले आहेत. मात्र, आता संजनाने आपला मोर्चा देशमुखांवरून अनघाकडे वळवला आहे. कृष्णजन्मत्सोवाच्या निमित्ताने अनघाला देखील पूजेचे आमंत्रण देण्यात आले होते (Aai Kuthe Kay Karte Latest Update).

अंकिताचं सत्य समोर आल्यानंतर आता ती अभिषेकच्या आयुष्यातून दूर झाली आहे. यानंतर पुन्हा एकदा अभि आणि अनघामध्ये जवळीक निर्माण होतेय. अरुंधतीच्या ऑपरेशवेळी देखील अनघानेच जबाबदारीने पुढे होत तिची सोबत दिली होती. याचवेळी अभि आणि अनघा पुन्हा एकदा चांगले मित्र झाले होते. म्हणूनच यश आणि इशाने तिला देखील घरी बोलवण्यासाठी आईला सांगितले होते.

संजना करणार अनघाला भडकवण्याचा प्रयत्न

यावेळी घरी आलेल्या अनघाला पाहून संजना आता आपला मोर्चा तिच्याकडे वळवणार आहे. घरातील कृष्णजन्म सोहळा आणि पूजा पार पडल्यानंतर संजना अनघाकडे येऊन तिला घरी आल्याबद्दल थँक्यू म्हणते. तर, इतकं सगळं होऊनही तू अभिकडे येतेस, तुला कसं जमलं? तुला नाही वाटत का की यात अरुंधतीची देखील चूक होती. तुमचं नातं तुटण्याला अरुंधती जबाबदार होती, असं देखील म्हणते. यावर अरुंधती तिला तिच्या ल्ग्नावेली अनिरुद्ध कसा पळून गेला होता, तरी तिने लग्न केलं या प्रसंगाची आठवण करून देत तिची बोलती बंद करते.

पाहा प्रोमो :

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte ) सध्या प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. मालिकेच्या कथानकाने सध्या अतिशय रंजक वळण घेतलं आहे. संजनाने साम-दाम-दंड-भेद वापरून अनिरुद्धशी लग्न करून देशमुखांच्या घरात संसार थाटला आहे. यानंतर आता देशमुखांच्या कुटुंबाची सूत्र एकहाती घेण्यासाठी संजनाची धडपड सुरु आहे.

पुरुष पहिले का जेवणार म्हणून घालणार वाद!

संजनाने देशमुखांच्या घरातील कृष्णजन्मोत्सवाच्या पूजेला बसण्यासाठी हट्ट घराला. तर, या पूजेला बसण्यासाठी तिने दिवसभर उपवास देखील धरला. मात्र, रात्री या पूजेनंतर घरातील पुरुषांना पहिल्या पंगतीत जेवण वाढले गेले. यावरून संजनाला राग आला. अर्थात पुरुषच पहिले का जेवणार, म्हणून संजनाने वाद घालायला सुरुवात केली. हे देशमुखांचं घर अगदीच मागासलेल्या विचारांचं आहे असं म्हणत तिने हा वाद उकरून काढला आहे. यावरून संजना आणि केदारमध्ये देखील तूतू-मैमै झाली. मात्र, पुन्हा एकदा अरुंधतीने या सगळ्यामध्ये पडत, संजनाला खडे बोल सुनावले आणि वाद देखील शमवला आहे.

अरुंधती झाली ‘समृद्धी’ची मालकीण

संजना घरात आल्यानंतर आता अप्पांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने देशमुखांच्या कुटुंबात राहावं, ती इथे राहिल्यानेच घरात शांतता नांदेल, असा विचार करणाऱ्या अप्पांनी देशमुखांचा ‘समृद्धी’ बंगला आता अनिरुद्ध आणि अरुंधती या दोघांच्याही नावावर समान वाटला आहे. अर्थात आता अरुंधती देखील या अर्ध्या घराची मालकीण झाली आहे. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा देशमुखांच्याच घरात राहणार आहे.

हेही वाचा :

हिंदीनंतर आता मराठी मंचावरही सादर होणार ‘इंडियन आयडॉल’, पाहा ‘इंडियन आयडॉल मराठी’ची खास झलक!

सलमान खानला मुंबई कोर्टाकडून दिलासा, प्लेस्टोअरच्या ‘सेलमोन भोई’ गेमवर घातली तत्काळ बंदी!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.