हिंदीनंतर आता मराठी मंचावरही सादर होणार ‘इंडियन आयडॉल’, पाहा ‘इंडियन आयडॉल मराठी’ची खास झलक!

2004मध्ये सोनी वाहिनीवर ‘इंडिया आयडॉल’ (India Idol) या हिंदी रियॅलिटी शो ची सुरुवात झाली होती. तेव्हापासून या कार्यक्रमाचे सलग 12 पर्व पार पडली आहेत. या हिंदी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. नव्या प्रतिभेला संधी देणं आणि त्यांच्या प्रतिभेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी या मंचाने नेहमीच पुढाकार घेतला आहे.

हिंदीनंतर आता मराठी मंचावरही सादर होणार ‘इंडियन आयडॉल’, पाहा ‘इंडियन आयडॉल मराठी’ची खास झलक!
Indian Idol marathi

मुंबई : 2004मध्ये सोनी वाहिनीवर ‘इंडिया आयडॉल’ (India Idol) या हिंदी रियॅलिटी शो ची सुरुवात झाली होती. तेव्हापासून या कार्यक्रमाचे सलग 12 पर्व पार पडली आहेत. या हिंदी कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. नव्या प्रतिभेला संधी देणं आणि त्यांच्या प्रतिभेला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी या मंचाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. याचेच एक पुढचे पाऊल म्हणजे हा शो आता मराठीतही (Indian Idol Marathi) येणार आहे.

अर्थात आता मराठी गायकांच्या प्रतिभेला मंच मिळणार आहे. नव्या टॅलेंटसाठी ही महत्त्वाची संधी असणार आहे. नुकतीच या शोची घोषणा करण्यात आली आहे. एक खास झलक शेअर करण्यात आली आहे, ज्यात ‘इंडियन आयडॉल मराठी’ची घोषणा करण्यात आली आहे. इंडियन आयडॉल शो आता मराठीत येणार म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढली आहे.

पाहा खास झलक

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

या कार्यक्रमाची केवळ एक झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मात्र अद्याप याची कोणतीही इतर माहिती समोर आलेली नाही. लवकरच या शोची पुढील घोषणा होणार आहे.

हिंदी ‘इंडियन आयडॉल’चे 12 पर्व संपन्न

नुकताच ‘इंडियन आयडॉल 12’चा महाअंतिम सोहळा पार पडला. गायक पवनदीप राजन हा ‘इंडियन आयडॉल 12’चा विजेता ठरला आहे. या यशामुळे संपूर्ण भारतातील गीत-संगीत रसिक पवनदीप राजनचे अभिनंदन करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवनदीप राजनला ही खास भेट मिळाली आहे.

या कार्यक्रमाचे परिक्षक सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्या व्यतिरिक्त, विशाल दादलानी, ग्रेट खली या सेलिब्रिटींनी या फायलन सिझनमध्ये आपला सहभाग नोंदवला. इंडियन आयडॉल 12 च्या सहा फायनलिस्ट्समध्ये चांगलीच चुरस रंगली होती. मात्र सर्व पाच स्पर्धकांना मागे टाकत इंडियन आयडॉलच्या 12व्या सिझनच्या ट्रॉफीवर पवनदीप राजनने आपलं नाव कोरलं. या यशामुळे पवनदीपचे संपूर्ण भारतभरातून स्वागत केले जात आहे.

विजेत्याला ट्रॉफी व्यतिरिक्त, रोख बक्षीस आणि करार!

‘इंडियन आयडल 12’ च्या विजेत्याला ट्रॉफी (Indian Idol 12 Prize Money) व्यतिरिक्त देखील अनेक बऱ्याच गोष्टी मिळतात. रिपोर्ट्सनुसार, विजेत्याला यावेळी 25 लाख रुपये बक्षीस रक्कम देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, एका संगीत कंपनीसोबत एक करार देखील केला जातो. त्याच वेळी, ‘टेली चक्कर’ मधील एका अहवालानुसार, ‘इंडियन आयडॉल 12’ चे विजेते आणि तसेच सर्व अंतिम स्पर्धकांना लंडनच्या वेम्बली स्टेडियममध्ये एका मैफिलीमध्ये सादर करण्याची संधी मिळेल.

हेही वाचा :

सलमान खानला मुंबई कोर्टाकडून दिलासा, प्लेस्टोअरच्या ‘सेलमोन भोई’ गेमवर घातली तत्काळ बंदी!

आईच्या अतिशय जवळ होता अभिनेता अक्षय कुमार, पाहा माय-लेकाचे काही खास फोटो…

Asha Bhosle Birthday Special | ‘इन आँखों की मस्ती’पासून ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’पर्यंत, ऐका आशा भोसले यांची सदाबहार गाणी!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI