AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी एक फुलवेडी…; ‘आई कुठे काय करते’मधील अरूंधतीचे हे खास फोटो पाहिलेत का?

Actress Madhurani Prabhulkar Post Classy photos : अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. आताही तिने काही खास फोटो शेअर केलेत. मधुराणीने पोस्टमध्ये काय म्हटलंय? तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होतेय. पाहा फोटो...

मी एक फुलवेडी...; 'आई कुठे काय करते'मधील अरूंधतीचे हे खास फोटो पाहिलेत का?
मधुराणी प्रभुलकरImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 16, 2024 | 7:43 PM
Share

स्टार प्रवाहवरची ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेतील अरूंधती तर प्रत्येकाला आपल्यातलीच एक वाटते. गृहिणींना तिच्या स्वत: चं प्रतिबिंब दिसतं. काहींना ती आपल्या आईसारखी वाटते…. पण मालिकेत ‘सिंपल’ पात्र साकारणारी अरूंधती अर्थात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड स्टायलिश आहे. ती वेगवेगळे लूक ट्राय करत असते. आताही तिने साडीत खास फोटोशूट केलंय. हे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. एक कविता पोस्ट करत तिने हे फोटो शेअर केलेत.

मधुराणीची पोस्ट जशीच्या तशी

मी एक फुलवेडी आहेच… फुलांवरच्या अनेक कविताही मी जमवल्या आहेत माझ्याकडे. त्यातली एक कविता खास तुमच्या साठी फुलाफुलांचे ——-

कुणी बांधले दारा तोरण फुलाफुलांचे ? आत घराच्या उभे नभांगण फुलाफुलांचे

मौनाची बोलकी डहाळी दरवळलेली नयनांना कळले संभाषण फुलाफुलांचे

रोज नवा पाऊस बरसतो संवादाचा किती किती झेलावे श्रावण फुलाफुलांचे ?

जगण्यामधल्या काट्यांनाही सुगंध आला त्यांच्याभवती होते कुंपण फुलाफुलांचे

पुन्हा पुन्हा वाढतात ठोके हृदयामधले फिरून आले नवे निमंत्रण फुलाफुलांचे

स्पर्शासाठी ,गालांसाठी , अधरांसाठी त्या रात्री शेजेवर भांडण फुलाफुलांचे

कोण असा सुकुमार लाडका वसंत होता? जन्माला ठेवलेस तारण फुलाफुलांचे – रमण रणदिवे

सोशल मीडियावर मधुराणी प्रभुलकर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंना पसंती दिली होती. तर काहींनी कमेंट करत तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. प्रतिम विलोभनीय खूप सुंदर मनमोहक गुलाबाच्या अनेक फुलांमध्ये सर्वात सुंदर नी हसरा… ताजा टवटवीत गुलाब प्रमाण मनमोहक सुंदर हास्य फारच सुंदर आणि फोटोग्राफी देखील तितकीच सुंदर त्या जोडीला कविता तर अति उत्तम…, असं एका चाहत्याने म्हटलं आहे.

मधुराणीने काहीच दिवसांआधी पुण्यातील भाजी मार्केटमध्ये फोटोशूट केलं होतं. एक छान वेगळं फोटोशूट करायचं. बरेच दिवस मनात होतं आणि अचानक ही सगळी टीम जुळून आली… ह्या उत्साही आणि creative gang चे कौतुक करावं तेवढं कमीच… आणि ठिकाण आहे… पुण्यातील भाजी मंडई… माझ्या वडिलांचं व्यवसायाचं ठिकाण… तुळशीबागेत माझं बालपण गेलं त्यामुळे मंडई हा बालपणीचा महत्वाचा भाग….! सकाळ- सकाळी भाजी लागत असताना केलेलं हे शूट कायम लक्षात राहील, असं म्हणत मधुराणीने हे क्लासी फोटो शेअर केलेत.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.