Video | टीव्हीच्या संस्कारी ‘बहू’चा मालदीवमध्ये बोल्ड अंदाज, बिकिनी परिधान करत दाखवली ‘परफेक्ट फिगर’!

Video | टीव्हीच्या संस्कारी ‘बहू’चा मालदीवमध्ये बोल्ड अंदाज, बिकिनी परिधान करत दाखवली ‘परफेक्ट फिगर’!
Shraddha Arya

टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्य (Shraddha Arya) लग्नानंतर पती राहुल नागलसोबत हनीमूनसाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे. लग्नानंतर दोघेही खूप व्यस्त होते, त्यामुळे ते हनिमूनला जाऊ शकले नव्हते. पण, आता श्रद्धा आणि राहुल वेळ मिळताच मालदीवमध्ये एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवत आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 28, 2021 | 10:45 AM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्य (Shraddha Arya) लग्नानंतर पती राहुल नागलसोबत हनीमूनसाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे. लग्नानंतर दोघेही खूप व्यस्त होते, त्यामुळे ते हनिमूनला जाऊ शकले नव्हते. पण, आता श्रद्धा आणि राहुल वेळ मिळताच मालदीवमध्ये एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवत आहेत. अलीकडेच श्रद्धा आर्यने मालदीवमधील अनेक फोटो पोस्ट केले आहेत. परंतु, आता तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो इंटरनेटवर आगीसारखा व्हायरल होत आहे.

श्रद्धा आर्यने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती बोल्ड अवतारात दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या व्हिडीओमध्ये ती पूलच्या बाजूला डान्स करताना दिसत आहे. तिने हातात बांगड्या घातल्या आहेत आणि ती धमाल डान्स करत आहे. व्हिडीओमध्ये श्रद्धाचा बोल्ड अवतार पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये ते तिला क्युट, गॉर्जियस आणि हॉट अशा प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Shraddha Arya (@sarya12)

एक महिन्यापूर्वी झाले लग्न!

श्रद्धा आर्यचे लग्न 16 नोव्हेंबर 2021 रोजी नौदलाचे कमांडर राहुल नागलसोबत झाले होते. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या विवाह सोहळ्याला ‘कुंडली भाग्यश्री’चे सहकलाकार अंजुम फकीह, सुप्रिया शुक्ला आणि ‘बालिका वधू’ स्टार शशांक व्यास आणि इतर स्टार्स उपस्थित होते.

प्रीताच्या भूमिकेने श्रद्धा आर्यला मिळाली प्रसिद्धी

श्रद्धाच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर ती 2004 मध्ये ‘इंडियाज बेस्ट सिनिस्टर्स की खोज’ या टॅलेंट शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने ‘मैं लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘तुम्हारी पाखी’, ‘ड्रीम गर्ल’ आणि ‘कुमकुम भाग्य’सह अनेक शोमध्ये काम केले आहे. ‘कुंडली भाग्य’मध्ये तिने फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रीता अरोरा यांची भूमिका साकारली होती, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

एक काळ असा होता जेव्हा श्रद्धानं खूप संघर्ष केला होता आणि कोणीही तिला विचारलं नाही. मात्र, आता श्रद्धा त्या टप्प्यावर आहे, जिथून ती केवळ प्रगतीचा मार्गावर आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की श्रद्धा टीव्ही इंडस्ट्रीतील अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्यांना एका एपिसोडसाठी मोठी रक्कम दिली जाते. श्रद्धा कुंडली भाग्याच्या एका भागासाठी सुमारे एक लाख रुपये घेते. इंडियाज बेस्ट सिने स्टार की खोजमध्ये सहभागी म्हणून काम करणारी श्रद्धा आज टीव्हीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं, मात्र, तिला कुंडली भाग्यमधून अधिक यश मिळालं.

हेही वाचा :

Wedding Fees | लग्नात बॉलिवूड कलाकारांची हजेरी हवीय? जाणून घ्या कोणता कलाकार किती मानधन आकारतो…

Bigg Boss Marathi 3 |लोकांची गर्दी, फटाक्यांची आतषबाजी! ‘बिग बॉस मराठी 3’ची ट्रॉफी घेऊन विशाल घरी परतला  

Salman Khan Birthday Celebration : पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानचं ग्रँड बर्थडे सेलिब्रेशन, चिमुकल्या आयतसोबत कापला केक!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें