अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या शूटिंगला सुरूवात, तुनिशा शर्माच्या कॅरेक्टरबद्दल निर्मात्यांचा मोठा निर्णय

तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघेही अली बाबा: दास्तान ए काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत होते.

अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या शूटिंगला सुरूवात, तुनिशा शर्माच्या कॅरेक्टरबद्दल निर्मात्यांचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 4:13 PM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुनिशाच्या आईने शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तुनिशा आणि शीजान खान हे दोघेही अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत होते. तुनिशाच्या आत्महत्येनंतर शीजान खान याला पोलिसांनी अटक केली. सध्या शीजान खान या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. यामुळे अली बाबा: दास्तान ए काबुल ही मालिका ऑफ एअर होईल, असा अनेकांचा अंदाजा होता. मात्र, तसे न होता मालिकेची शूटिंग परत एकदा सुरू करण्यात आलीये.

तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघेही अली बाबा: दास्तान ए काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. शीजान खान हा मालिकेमध्ये पुन्हा दिसणार नसल्याची चर्चा आहे. इकडे मालिकेच्या निर्मात्यांनी शूटिंगला नव्या जोमाने सुरूवात केलीये.

अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या प्रेक्षकांना प्रश्न पडलाय की, तुनिशा आणि शीजान खान यांच्या भूमिकेमध्ये आता कोण दिसणार? परंतू निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत मालिका वेगळ्या ट्रॅकवर नेण्याचे ठरवले आहे.

आता यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, तुनिशा शर्मा आणि शीजान खान यांच्या भूमिका कोणीही रिप्लेस करणार नाहीये. शीजान खान हा कोठडीमधून बाहेर आल्यावर हे स्पष्ट होईल की, यापुढे तो मालिकेत दिसणार आहे की नाही.

तुनिशा शर्मा हिने अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या सेटवरच गळफास घेतल्याने निर्मात्यांनी आता सेट इतर ठिकाणी हलवला आहे. कारण पूर्वीच्या सेटवर तुनिशाने गळफास घेतल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तुनिशा शर्मा हिने 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवर गळफास घेतला होता. शीजान खान याच्यासोबत तिचे ब्रेकअप झाल्याने ती तणावामध्ये होती आणि यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याचे तिच्या आईने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.