Bigg Boss 15  | पती रितेशने नॅशनल टेलिव्हिजनवरच केलं कीस, लाजेनं लाल झाली राखी सावंत!

Bigg Boss 15  | पती रितेशने नॅशनल टेलिव्हिजनवरच केलं कीस, लाजेनं लाल झाली राखी सावंत!
Rakhi Sawant

शोमध्ये राखी सावंत आणि रितेश त्यांचा एक वेगळा खेळ खेळत आहेत, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळत आहे. आता राखीने फिनालेच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. शोच्या येत्या एपिसोडमध्ये राखी आणि रितेश यांच्यातील एक खास क्षण दाखवण्यात आला आहे. जिथे रितेश आणि राखीने सर्वांसमोर किस केले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 11, 2021 | 1:31 PM

मुंबई : ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) या रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. शोमध्ये वादावादी आणि मारामारीसोबतच प्रेक्षकांना रोमान्सही पाहायला मिळत आहे. करण आणि तेजस्वीसोबत या शोमध्ये आणखी एक कपल आहे, ज्याची केमिस्ट्री चांगलीच पसंत केली जात आहे. हे कपल म्हणजे शोमध्ये व्हीआयपी स्पर्धक म्हणून आलेले राखी सावंत (Rakhi Sawant) आणि तिचा पती रितेश (Ritesh) आहेत.

या शोमध्ये राखी सावंत आणि रितेश त्यांचा एक वेगळा खेळ खेळत आहेत, ज्याला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळत आहे. आता राखीने फिनालेच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. शोच्या येत्या एपिसोडमध्ये राखी आणि रितेश यांच्यातील एक खास क्षण दाखवण्यात आला आहे. जिथे रितेश आणि राखीने सर्वांसमोर किस केले.

रितेशने घेतले राखीचे चुंबन!

शुक्रवारच्या एपिसोडमध्ये राखी आणि रितेश बाकीच्या स्पर्धकांना त्यांच्या लग्नाबद्दल काही गोष्टी सांगतात. यानंतर सर्व स्पर्धक कपलकडे किस करण्याची मागणी करू लागतात. ते सगळे मोठ्याने ओरडतात, ‘किस, किस, किस’,  त्यानंतर रितेश राखीकडे जातो आणि तिचे चुंबन घेतो. या क्षणानंतर, जिथे रितेश अजिबात लाजत नाही, तर राखीचे लाजणे काही संपतच नाही आणि ती तिथून निघून जाते. त्यानंतर बाकीचे स्पर्धक त्यांची थट्टा करतात.

रितेशच्या पहिल्या लग्नाचा खुलासा

नुकताच रितेशच्या पहिल्या लग्नाचा खुलासा सोशल मीडियावर झाला आहे. एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याची पहिली पत्नी आणि मुलासोबत दिसत आहे. त्यांचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर रितेशच्या पहिल्या पत्नीने सांगितले आहे की, ती बिहारमध्ये राहते. दोघेही विवाहित होते आणि त्यांना एक मुलगा देखील आहे. दोघेही आता वेगळे राहत असले, तरी अद्याप दोघांचा घटस्फोट झालेला नाही.

राखी सावंत ‘बिग बॉस’ची व्हीआयपी स्पर्धक

राखी सावंतने ‘बिग बॉस 15’च्या फिनालेचे तिकीट जिंकले आहे आणि अंतिम फेरीमध्ये स्वतःची जागा निश्चित केली आहे. अलीकडेच या शोमध्ये एक टास्क ठेवण्यात आला होता, ज्यानंतर व्हीआयपी स्पर्धकांपेक्षा नॉन व्हीआयपी स्पर्धकांपेक्षा जास्त पैसे दिले गेले. त्यामुळे रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी, अभिजित बिचुकले आणि रितेश आता नॉन-व्हीआयपी स्पर्धक बनले आहेत. घरात आता फक्त एकच स्पर्धक आहे जी व्हीआयपी आहे, ती म्हणजे राखी सावंत. त्यामुळे आता राखी आणखी पुढे काय करते, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा :

Ali Akbar : बिपीन रावत यांच्या निधनावर स्माईली इमोजीमुळं दिग्दर्शक अली अकबर भडकला, थेट धर्मांतराची घोषणा, हिंदू नावही जाहीर

Happy Birthday Kimi Katkar | ‘जुम्मा चुम्मा’ गर्ल किमी काटकर, मनोरंजन विश्वात आल्यावर बदलले नाव!

Aarya Season 2 Review | तिसऱ्या सीझनची वाट पाहायला लावणारा ‘आर्या 2’, सुष्मिता सेनच्या धमाकेदार अ‍ॅक्शनने जिंकलं प्रेक्षकांचं मन!


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें