Bigg Boss 15 | सगळ्या स्पर्धकांचं एकमत, रश्मी देसाई-अभिजीत बिचुकले ‘तिकीट-टू-फिनाले’च्या शर्यतीतून बाद!

Bigg Boss 15 | सगळ्या स्पर्धकांचं एकमत, रश्मी देसाई-अभिजीत बिचुकले ‘तिकीट-टू-फिनाले’च्या शर्यतीतून बाद!
Bigg Boss 15

‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) फिनालेला आता अवघे काही दिवस उरले आहेत. स्पर्धकांनी ट्रॉफी जिंकण्यासाठीची तयारी केली आहे आणि एकमेकांना खडतर स्पर्धा देत आहेत. पण, हा शो जितका फिनाले जवळ येत आहे, तितकेच स्पर्धकांच्या नात्यातही अंतर वाढत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 28, 2021 | 12:22 PM

मुंबई : ‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) फिनालेला आता अवघे काही दिवस उरले आहेत. स्पर्धकांनी ट्रॉफी जिंकण्यासाठीची तयारी केली आहे आणि एकमेकांना खडतर स्पर्धा देत आहेत. पण, हा शो जितका फिनाले जवळ येत आहे, तितकेच स्पर्धकांच्या नात्यातही अंतर वाढत आहे. करण कुंद्रा, तेजस्वी आणि उमरच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसत आहे. मात्र, करण त्याचा मित्र आणि लेडी लव्ह यांना एकत्र आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे.

मागच्या एपिसोडमध्ये तेजस्वी प्रकाश तिचा मित्र निशांत भट्टसोबत करण कुंद्राविषयी बोलताना दिसली होती. तेजस्वीने निशांतला सांगितले की, करणला सगळ्यांना खुश ठेवायचे आहे, ज्यांना तो आवडत नाही आणि जे त्याला खूप काही बोलतात, करणने या सर्वांना देखील मित्र बनवले आहे. पण करणशी कोणी गैरवर्तन केले तर तेजस्वी त्याच्याशी बोलत नाही.

राखीने करणला केली तेजस्वीशी लग्न करण्याची विनंती

राखी सावंत, करण कुंद्रासोबत तेजस्वीसोबतच्या नात्याबद्दल बोलताना दिसली. राखीने करणला सांगितले की, जर मला मार्चमध्ये लग्न करायचे असेल, तर मार्चमध्येच त्याने तेजस्वीशी लग्न करावे. तेजस्वीला बाहेर जाऊन सोडून देऊ नकोस, असेही राखीने करणला सांगितले. राखीच्या बोलण्यावर करणने सांगितले की, तो बाहेर जाऊन तेजस्वीसोबतचे नाते आणखी घट्ट करेल.

रश्मी-अभिजीत तिकीट-टू-फिनालेमधून बाहेर!

बिग बॉसने कुटुंबातील सदस्यांना एका सदस्याचे नाव देण्यास सांगितले, ज्याला ते तिकीट-टू-फिनाले टास्कमधून वगळू इच्छितात, ज्याचे नाव कुटुंबातील सदस्यांनाही नामांकित केले जाईल. मात्र, कुटुंबातील बहुतांश सदस्यांनी रश्मी आणि अभिजीतची नावे घेतली. दोघांना समान 5-5 मते मिळाली, ज्यामुळे बिग बॉसने दोघांनाही तिकीट-टू-फिनाले टास्कमधून वगळले.

तिकीट-टू-फिनाले कार्यात तेजस्वीने रश्मीचे नाव घेतले, तर करण कुंद्राने अभिजीत बिचुकलेचे नाव घेतले आहे. करणने टास्कमध्ये रश्मीचे नाव घ्यावे आणि तिला बाहेर करावे, अशी तेजस्वीची इच्छा होती. पण करणने करणने रश्मीचे नाव घेण्यास नकार दिला, ज्यावर तेजस्वी करणवर रागावताना दिसली.

हेही वाचा :

Happy Birthday Salman Khan | एका सुपरहिट चित्रपटानंतर तब्बल 6 महिने रिकामा बसून राहिला सलमान खान! वाचा नेमकं काय झालं?

Sunny Leone | ‘शाब्दिक’ वादानंतर सारेगामा बॅकफूटवर, अखेर सनी लिओनच्या ‘मधुबन’ गाण्यात बदल होणार!

ज्या वडिलांच्या उपचारासाठी स्पर्धेत सहभागी झाला, नियतीने त्यांनाच हिरावून नेलं! India’s Best Dancer फेम संकेतला पितृशोक


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें